Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मौजे वेळे गावाच्या पुनर्वसनाबाबत 63 खातेदारांनी संपर्क साधावा

सातारा / प्रतिनिधी : सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील कोअर झोनमधील मौजे वेळे, ता. जावली, जि. सातारा या गावचे पुनर्वसन होणार निश्‍चित आहे. तरी वेळे

राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित
पावसाची हवामान विभागालाच हुलकावणी
वीरनारी शेतकरी उत्पादन कंपनीला भारतीय सेनेचे बहुमूल्य योगदान

सातारा / प्रतिनिधी : सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील कोअर झोनमधील मौजे वेळे, ता. जावली, जि. सातारा या गावचे पुनर्वसन होणार निश्‍चित आहे. तरी वेळे गावातील संबंधितांनी पुनर्वसनकामी उपवनसंरक्षक सातारा या कार्यालयास त्वरीत संपर्क साधावा. वेळेत संपर्क न साधल्यास, पुनर्वसन प्रक्रियेस विलंब झाल्यास त्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही, असे प्रकल्प अधिकारी तथा उपवन संरक्षक एम. एन. मोहिते यांनी कळविले आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील कोअर झोनमध्ये एकूण 52 गावांचे क्षेत्र समाविष्ठ आहे. त्यापैकी 19 गावे कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे पुर्वीच पुनर्वसित झाली आहेत. तसेच 18 गावांचे अभयारण्यातील हक्क कायम केले आहेत. उर्वरित 15 गावांचे पुनर्वसन अभयारण्याबाहेर करावयाचे आहे. या पुनर्वसन प्रक्रियेमध्ये मौजे वेळे, ता. जावळी या गावाचा समावेश आहे.
गावामध्ये मुळ 135 खातेदारांचे व 126 ब पत्रक खातेदारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय पुनर्वसन सातारा यांच्यामार्फत संकलन यादी तयार करण्यात आली आहे. तयार करण्यात आलेल्या संकलनानुसार 61 खातेदार यांचे पुनर्वसन खंडाळा तालुक्यातील मौजे माने कॉलनी, भोळी व धनगरवाडी येथे करण्यात येणार आहे. तसेच 11 खातेदारांनी पळस्पे, ता. पवनेल, जि. रायगड येथे पुनर्वसन करण्याबाबत मागणी केली आहे. या व्यतिरीक्त उर्वरित 63 खातेदार हे परगावी राहत असल्याने या खातेदारांनी पुनर्वसनाबाबत अद्याप या कार्यालयास कोणतीही मागणी किंवा संपर्क साधला नाही.
उर्वरित 63 खातेदारांना आवाहन करण्यात येते की, मौजे वेळे, ता.जावली, जि. सातारा या गावचे पुनर्वसन होणार हे निश्‍चित आहे. आपण वेळेत या कार्यालयास संपर्क साधावा. तसे न झाल्यास व त्यामुळे पुनर्वसन प्रक्रियेस विलंब झाल्यास त्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. तरी संबंधितांनी पुनर्वसनकामी उपवनसंरक्षक सातारा या कार्यालयास त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा उपवन संरक्षक एम. एन. मोहिते यांनी केले आहे.

COMMENTS