Homeताज्या बातम्या

परळीतील तौहीद पठाण हत्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करा; खासदार बजरंग सोनवणे यांची मागणी, पीडित कुटुंबाची घेतली भेट

परळी : परळीत गुंडगिरी वाढतच असून तौहीद पठाण हत्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे या

परळीतील तोहीद खान हत्या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा द्या-नुमान चाऊस
तोहिद खान हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या-सादिक इनामदार
तोहीद खान हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावीकामरान खान शिवसेना अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख बीड

परळी : परळीत गुंडगिरी वाढतच असून तौहीद पठाण हत्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. येथील युवक तौहीद पठाण याची काही दिवसांपूर्वी झालेली निर्घृण हत्या अत्यंत दुर्दैवी, संतापजनक आणि मन हेलावून टाकणारी आहे. या भीषण घटनेमुळे संपूर्ण परळी परिसरासह जिल्ह्यात मोठी हळहळ व्यक्त होत असून, पठाण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

या पार्श्वभूमीवर, खासदार बजरंग सोनवणे यांनी आज पीडित कुटुंबाच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि संपूर्ण कुटुंबियांचे सांत्वन केले. कमावता आणि तरुण मुलगा गमावल्यामुळे पठाण कुटुंबियांना झालेल्या वेदना पाहून उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले होते. या कठीण प्रसंगी आम्ही पठाण कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, अशी ग्वाही देत खासदारांनी या प्रकरणातील दोषींवर अत्यंत कठोर आणि तातडीने कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार सोनवणे म्हणाले, “तौहीदची हत्या ही केवळ एका तरुणाची हत्या नसून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारी घटना आहे. अशा कठीण प्रसंगी पठाण कुटुंबाला धीर देणे हे आपले कर्तव्य आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.” दरम्यान, या घटनेमुळे परळीत नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आरोपींना तात्काळ बेड्या ठोकून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे आणि गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.

COMMENTS