Homeताज्या बातम्या

कर्जत पोलिसांची मोठी कारवाई; दरोड्याच्या गुन्ह्यातील ८ वर्षांपासून फरार आरोपी सागर भिताडे अखेर जेरबंद

कर्जत : दरोड्याच्या गुन्ह्यात तब्बल आठ वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देऊन फरार असलेल्या एका सराईत आरोपीला अटक करण्यात कर्जत पोलिसांना मोठे यश आल

कर्जत तालुक्यातील दुरगाव येथे कौटुंबिक वादातून सावत्र आईला बेदम मारहाण; हात-पाय बांधून जंगलात सोडल्याचा आरोप
मिरजगावमध्ये प्रतिबंधित इंजेक्शनचा मोठा साठा जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करत ५८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
गावठी कट्टे विकणारा कर्जत पोलिसांच्या जाळ्यात दोन गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे जप्त ; ६२ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

कर्जत : दरोड्याच्या गुन्ह्यात तब्बल आठ वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देऊन फरार असलेल्या एका सराईत आरोपीला अटक करण्यात कर्जत पोलिसांना मोठे यश आले आहे. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे कर्जत पोलिसांच्या तपास कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कर्जत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका दरोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सागर दत्तात्रय भिताडे (वय ३०, रा. भिताडेवस्ती, ता. कर्जत) हा गुन्हा घडल्यापासून गेली आठ वर्षे पोलिसांना चकवा देत फरार होता. दरम्यान, आरोपी सागर भिताडे हा आपल्या राहत्या घरी आला असल्याची गोपनीय माहिती कर्जतचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांना मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वेळ न घालवता तत्काळ तपास पथक तयार करून भिताडेवस्ती परिसरात सापळा रचला आणि आरोपीला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता त्याने दरोड्याच्या गुन्ह्याची कबुली दिली, त्यानंतर त्याला अधिकृतपणे अटक करण्यात आली आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर मुलाणी, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोहाडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब मुळीक तसेच विशाल शिरसागर, किरण बोहाडे, प्रकाश दंताडे, अमोल रायकर, नानासाहेब वायभारे, महिला पोलीस अंमलदार आशा घामकर, आबासाहेब आवारे आणि सायबर सेलचे राहुल गुंड यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे परिसरात कायद्याचा धाक पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

COMMENTS