Homeताज्या बातम्या

अकोले तालुक्यात खळबळ; वीज चोरी पकडणाऱ्या महावितरणच्या पथकावर हल्ला, आरोपींवर गुन्हा दाखल

अकोले : अकोले तालुक्यातील अंभोळ येथे वीज चोरीची तपासणी करत असताना महावितरणच्या पथकावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अकोले पोल

तहसील कार्यालयासमोर कांदे ओतून आंदोलन; अकोलेत किसान सभेची जोरदार निदर्शने
दहावीच्या परीक्षे गणोरे केंद्रात आर्यन विवेक आंबरे प्रथम
अगस्ती आश्रमामुळे अकोलेच्या भूमीला ऐतिहासिक महत्त्व; गोविंदगिरी महाराजांच्या उपस्थितीत अकोलेत महिनाभर अखंड कीर्तन महोत्सव
Control the Capital's rising crime graph | Hindustan Times

अकोले : अकोले तालुक्यातील अंभोळ येथे वीज चोरीची तपासणी करत असताना महावितरणच्या पथकावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण करणे आणि बेकायदेशीर वीज चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरणच्या कोतूळ उपकेंद्रांतर्गत एक पथक अंभोळ येथे अनधिकृत वीज वापराची तपासणी करण्यासाठी गेले होते. तपासणीदरम्यान प्रभाकर साबळे यांच्या घरातील वीजमापकात (मीटर) फेरफार करून, बाहेर जाणारी तार येणाऱ्या तारेला जोडून वीज चोरी सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. यानंतर सहाय्यक अभियंता हर्षल मांडगे यांनी कायदेशीर कारवाई सुरू केली. मात्र, याच वेळी भागवत साबळे याने पथकाला शिवीगाळ करत खोऱ्याच्या दांड्याने मारण्याचा प्रयत्न केला, तसेच कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली.

घटनेनंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अकोले पोलीस ठाण्यात धाव घेतली. सुरुवातीला काही राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्हा दाखल करण्यास विलंब होत असल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे विभागीय सचिव अमोल आभाळे यांनी कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार यांच्याशी संपर्क साधून या घटनेचा तीव्र निषेध केला व तातडीने कारवाई न झाल्यास बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला. अखेर कोतूळ व ब्राह्मणवाडा विभागातील कर्मचारी पोलीस ठाण्यात जमा झाल्यानंतर, पोलीस उपनिरीक्षक मोहन बोरसे यांनी हर्षल मांडगे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.

कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांची गंभीर दखल

वीज ग्राहकांच्या सेवेसाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी थकीत वीजबिल वसुली आणि वीज चोरीविरोधी मोहिमा राबवत आहेत. या कारवाईदरम्यान कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण व धक्काबुक्कीच्या घटनांना सामोरे जावे लागत असून अशा प्रकारांची गंभीर दखल घेण्यात येत आहे. संबंधितांवर तातडीने कठोर फौजदारी कारवाई करण्यात येत असल्याचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार यांनी सांगितले.

COMMENTS