पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी लोकहिताच्या योजना राबविल्या : प्रशांत मुथ्था

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी लोकहिताच्या योजना राबविल्या : प्रशांत मुथ्था

प्रतिनिधी : नगर पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्ताने सेवा व समर्पण अभियान कार्यक्रमांतर्गत अनेक लोक हिताचे कार्यक्रम भारतीय जनता

येत्या चार-पाच दिवसांत शाळा उघडण्याचा निर्णय होईल : राजेश टोपे l DAINIK LOKMNTHAN
समताच्या विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण
भर पावसात केले पुण्यातील नेत्यांनी मनसेच्या शाखेचे केले उदघाटन

प्रतिनिधी : नगर

पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्ताने सेवा व समर्पण अभियान कार्यक्रमांतर्गत अनेक लोक हिताचे कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुरू आहेत.         

पहिल्या लॉक डाऊन च्या काळामध्ये हातावर पोट असलेल्या अनेक नागरिकांना, फेरीवाल्यांना आपला धंदा पुन्हा कसा सुरु करावा असा प्रश्न पडलेला होता. परंतु पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अशा नागरिकांसाठी व फेरीवाल्यांसाठी आत्मनिर्भर स्व- निधी योजना अमलात आणली, या योजनेअंतर्गत अनेक नागरिकांनी याचा फायदा घेत 10 हजार रुपयांचे बीन व्याजी कर्ज मिळविले व त्यातून पुन्हा आपला रोजगाराचा प्रश्न, धंदा सुरू करण्याचा प्रश्न त्यांचा मिटला गेला.कर्ज घेऊन त्याचे हप्ते नियमित रित्या फेडले गेले. आता पुन्हा या नागरिकांना शासनाच्या वतीने 20 हजार रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे. पहिले कर्ज फेडल्यामुळे व या योजनेचा लाभ घेतल्याने, पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या वाढदिवस निमित्ताने सेवा व समर्पण अभियान कार्यक्रमांतर्गत अशा नागरीकांचा अहमदनगर शहर भारतीय जनता पार्टी, मध्य मंडलाच्या वतीने सत्कार करण्यात आला.      

मंडल अध्यक्ष अजय चितळे यांच्या उपस्थितीमध्ये गांधी मैदान येथील पक्ष कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी संघटन सरचिटणीस प्रशांत मुथा, व्यापारी आघाडीप्रमुख गोपाल वर्मा, ज्ञानेश्वर धिरडे, ज्ञानेश्वर भांगे, राजू वाडेकर, दिनेश वाडेकर, विजय निंबाळकर, नितीन गंगेकर, उपस्थित होते.          

छोट्या छोट्या व्यवसायिकान बरोबरच अनेक फेरीवाले व जुने कपडे विक्रेते फेरीवाले श्रमजीवी विकास संस्था यांच्या  सभासदांनी सदर योजनेचा लाभ घेतलेला होता.       

भाजप मध्य मंडलाच्या वतीने असंघटित कामगारानसाठी ई- श्रम पोर्टल वर लवकरच पक्षाच्या वतीने नोंदणी सुरू करण्यात येणार असल्याचे मंडल अध्यक्ष अजय चितळे यांनी सांगितले.

COMMENTS