अकोले : कोतूळ (ता. अकोले) येथील बापूसाहेब देशमुख लिखित ‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज’ (मराठी) आणि ‘द पायोनिअर ऑफ मराठा एम्पा
अकोले : कोतूळ (ता. अकोले) येथील बापूसाहेब देशमुख लिखित ‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज’ (मराठी) आणि ‘द पायोनिअर ऑफ मराठा एम्पायर : छत्रपती शिवाजी महाराज’ (इंग्रजी) या दोन ऐतिहासिक पुस्तकांचा भव्य प्रकाशन सोहळा आज शनिवारी (दि. १३ जून २०२६) सकाळी साडेदहा वाजता पुणे येथे संपन्न होत आहे.
पुण्यातील मंगळवार पेठ मेट्रो स्थानकाजवळील ‘ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या माहिती तंत्रज्ञान संस्थेच्या’ (AISSMS) सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या शुभहस्ते या दोन्ही पुस्तकांचे अधिकृत प्रकाशन करण्यात येणार आहे.
याप्रसंगी पतितपावन संघटनेचे अध्यक्ष प्रा. एस. झेड. देशमुख, भारत इतिहास संशोधन मंडळाचे डॉ. श्रीमंत कोकाटे, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, उद्योजक रोहिदास दांगट, बाबाराजे जाधवराव तसेच सरदार पिलाजी जाधवराव यांचे वंशज प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. छत्रपती राजाराम महाराज स्मारक समिती (पुणे), बापूसाहेब देशमुख मित्रमंडळ (पुणे व अहिल्यानगर) यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, सर्व इतिहासप्रेमी आणि नागरिकांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

COMMENTS