Homeताज्या बातम्या

राहात्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा फरार आरोपी शिर्डी-कोपरगाव रस्त्यावर जेरबंद; न्यायालयाने सुनावली ४ दिवसांची पोलीस कोठडी

राहाता : शहरातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या फरार आरोपीस राहाता पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक के

ज्येष्ठ चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांचे निधन; ७९ व्या वर्षी घेतला अंतिम श्वास
संजीवनी अकॅडमी प्री-सुब्रतो फुटबॉल स्पर्धेत उपविजेता; रौप्य पदकावर कोरले नाव
औरंगाबाद जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी आ.विलास भुमरे उपाध्यक्षपदी रामराव शेळके यांची बिनविरोध निवड
धक्कादायक| लासलगावी खाजगी क्लासमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोस्को  अंतर्गत गुन्हा दाखल

राहाता : शहरातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या फरार आरोपीस राहाता पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. शिर्डी-कोपरगाव मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ही धडक कारवाई केली. न्यायालयाने आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ जून रोजी दुपारी अडीचच्या सुमारास पीडित मुलगी तिच्या मैत्रिणी आणि बहिणींसोबत आईस्क्रीम घेण्यासाठी जात होती. पैसे आणण्यासाठी ती पुन्हा घरी परतली असता तिची नजर चुकवून आरोपी हरीदास अर्जुन गायकवाड याने तिचा हात पकडला आणि तिला जबरदस्तीने खंडोबा मंदिर परिसरातील एका रिकाम्या फ्लॅटमध्ये (सदनिकेत) नेले. तेथे आरोपीने मुलीला धमकावून तिचा विनयभंग केला. या धक्कादायक प्रकारानंतर राहाता पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला होता.

राहाता पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. अखेर तो शिर्डी-कोपरगाव रस्त्यावर असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी बुधवारी रात्री त्याला बेड्या ठोकल्या. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी दिली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक कोमल कुमावत, पोलीस अंमलदार मच्छिंद्र शिरसाठ, संदीप गडाख आणि होमगार्ड अभिजित शिंदे यांच्या पथकाने केली.

COMMENTS