Homeताज्या बातम्या

नवी दिल्लीत गायक गुरू रंधावाच्या जिमबाहेर गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील पश्चिम विहार परिसरात प्रसिद्ध पंजाबी गायक गुरू रंधावाच्या जिमबाहेर गुरुवारी झालेल्या गोळीबारामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

पंजाबमध्ये भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू, १५ हून अधिक जखमी
राजधानीत ‘कॉकरोच जनता पार्टी’चा एल्गार; नीट घोटाळ्याप्रकरणी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
दिल्लीत अग्नीतांडव; २१ जणांचा मृत्यू, ३७ जणांना वाचवण्यात यश
गायक गुरू रंधावाच्या जिमबाहेर गोळीबार; लॉरेन्स बिष्णोई गँगने स्वीकारली  जबाबदारी - Marathi News | Singer guru randhawa gym firing delhi lawrence  bishnoi gang claims responsibility ...

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील पश्चिम विहार परिसरात प्रसिद्ध पंजाबी गायक गुरू रंधावाच्या जिमबाहेर गुरुवारी झालेल्या गोळीबारामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी व्यायामशाळेच्या परिसरात अंधाधुंद गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पोबारा केला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र परिसरात कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी व्यायामशाळेसमोर येताच सलग गोळीबार केला. या गोळीबारात व्यायामशाळेच्या काचांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिक आणि जिममध्ये उपस्थित असलेल्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिसराचा ताबा घेऊन तपास सुरू केला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर काही संदेश आणि ऑडिओ क्लिप (ध्वनीचित्रफिती) मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्यामध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रसारित होत असलेल्या या ध्वनीमुद्रणात संबंधित व्यक्तीने हल्ल्यामागील कारणाबाबतही काही दावे केले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या संदेशांची आणि ऑडिओ क्लिपची सत्यता अद्याप अधिकृतरीत्या सिद्ध झालेली नाही.

पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या सर्व दाव्यांची पडताळणी सुरू केली आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांच्या विशेष पथकांद्वारे आरोपींचा शोध घेतला जात असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच गोळीबारामागील नेमके कारण आणि आरोपींची अधिकृत माहिती समोर येईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे राजधानीतील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

COMMENTS