Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेस्टच्या कर्मचार्‍यांचा संप सात दिवसांनी मागे

मुंबई : पगारवाढीसह अन्य काही मागण्यांसाठी बेस्टच्या कंत्राटी कर्मचार्‍यांनी पुकारलेला संप सातव्या दिवशी मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ श

नांदेड विभागाची विशेष तिकीट तपासणी मोहीम; ३३९ विनातिकीट प्रवाशांकडून २.३३ लाखांचा दंड वसूल
24 कोटींच्या ’माता व बाल’ रुग्णालयात अवघ्या 10 दिवसांतच वॉटर फिल्टर बंद!गळती, लिफ्ट बिघाडानंतर आता पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न; व्यवस्थेवर डॉ. गणेश ढवळे यांचा सवाल
के.जे.सोमैया महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात

मुंबई : पगारवाढीसह अन्य काही मागण्यांसाठी बेस्टच्या कंत्राटी कर्मचार्‍यांनी पुकारलेला संप सातव्या दिवशी मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर कामगार संघटनांनी हा निर्णय घेतला आहे.
‘समान काम, समान वेतन’ द्या, कंत्राटी कर्मचार्‍यांना बेस्टच्या सेवेत कायमस्वरूपी घ्या आणि पगारवाढ द्या अशा मागण्यांसाठी ‘बेस्ट’ कंत्राटी कामगारांनी गेल्या सात दिवसांपासून आंदोलनाचे हत्यार उपसले होते. हळूहळू मोठ्या संख्येने कामगार या संपात सहभागी झाल्याने मुंबई शहर व उपनगरातील बस सेवा चांगलीच कोलमडली. त्यामुळे मुंबईकरांचे मोठे हाल झाले. कामगारांच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी सरकारी पातळीवर प्रश्‍न सुरू होते. मात्र, तोडगा निघत नव्हता. जवळपास 800 बसेस आगारातच अडकून पडल्याने मुंबईकरांची कोंडी झाली होती. राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र, तरीही मुंबईकरांना व्यवस्थित सेवा मिळत नव्हती. या सगळ्या परिस्थितीवर व कामगारांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी संघटनांच्या प्रतिनिधींची व मुख्यमंत्री शिंदे यांची सोमवारी रात्री उशिरा बैठक झाली. या बैठकीत कामगारांच्या प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यानंतर आज सकाळी आझाद मैदानात एकत्र येऊन कंत्राटी कर्मचार्‍यांनी संप मागे घेण्यात आल्याची घोषणा केली. मुंबईकरांना अधिक त्रास होऊ नये अशी भूमिका दोन्ही बाजूंनी मांडण्यात आल्याचे कर्मचार्‍यांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

COMMENTS