नांदेड : थोर क्रांतिकारक, क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त समरसता मंच, जिल्हा नांदेडच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार

नांदेड : थोर क्रांतिकारक, क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त समरसता मंच, जिल्हा नांदेडच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते व नागरिकांनी त्यांच्या संघर्षमय जीवनकार्याचे स्मरण करून आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव केला.
याप्रसंगी समरसता मंचाचे जिल्हा संयोजक राजेश मांजरमकर यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या राष्ट्रभक्तीपूर्ण व समाजोन्नतीच्या कार्याची माहिती देत, त्यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता अधोरेखित केली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी ज्येष्ठ स्वयंसेवक अरुण जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास समरसता मंचाचे कार्यकर्ते माणिक भोसले, हणमंत टेकाळे, सुदाम पाठक, दत्ता तालकोकुलवार, सुनील अर्धापूरकर, जनार्दन वाकोडकर, प्रा. मुंडे, प्रा. हरनावळे, अनिल डोईफोडे, प्रवीण कुलकर्णी, अॅड. नागराज मांजरमकर, नगरसेवक आशिष नेरलकर तसेच परिसरातील ज्येष्ठ स्वयंसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.

COMMENTS