मुंबई : मुंबई विमानतळावर एका महिला प्रवाशाला अचानक चक्कर येऊन ती बेशुद्ध पडली. तिची प्रकृती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच केंद्रीय औद्योगिक सुर

मुंबई : मुंबई विमानतळावर एका महिला प्रवाशाला अचानक चक्कर येऊन ती बेशुद्ध पडली. तिची प्रकृती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या दोन महिला जवानांनी तातडीने धाव घेत सीपीआर देत उपचार सुरू केले. छातीवर दाब देण्याची आपत्कालीन वैद्यकीय प्रक्रिया करून त्यांनी महिलेची श्वसनक्रिया पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. काही मिनिटांत महिलेची प्रकृती सुधारल्यानंतर वैद्यकीय पथकाने पुढील उपचार केले. जवानांच्या प्रसंगावधानामुळे महिलेचे प्राण वाचल्याने त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

COMMENTS