Homeताज्या बातम्या

 कोपरगाव तहसीलमध्ये आज आ. काळेंचा जनता दरबार  

कोपरगाव : मतदारसंघातील नागरिकांच्या शासकीय कामांतील अडचणी तत्काळ सोडविण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात येणारा जनता द

शिवसेना उपजिल्हाप्रमुख भागवत मुंगसे यांचे निधन
बालमटाकळीत 950 मीटर लांबीच्या बंधाऱ्याची कामे पूर्ण
वारकरी संप्रदाय हा सर्व समाजाला घेऊन चालणारामाजी मंत्री थोरात ; संगमनेर खुर्द येथे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात


कोपरगाव : मतदारसंघातील नागरिकांच्या शासकीय कामांतील अडचणी तत्काळ सोडविण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात येणारा जनता दरबार सोमवारी (दि. ८) दुपारी ३ वाजता कोपरगाव तहसील कार्यालयात होणार आहे. पंचायत समितीच्या विविध विभागांशी संबंधित तक्रारी व प्रश्न यावेळी ऐकून त्यावर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जनसंपर्क कार्यालयाने दिली.
मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिक, दिव्यांग, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक तसेच शेतकरी यांची विविध शासकीय कार्यालयांमध्ये अनेक कामे प्रलंबित असतात. या कामांसाठी वारंवार कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत आणि नागरिकांच्या अडचणींचे त्वरित निराकरण व्हावे, या उद्देशाने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
जनता दरबारात नागरिकांच्या तक्रारी व अडचणी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोर मांडल्या जाणार असून त्यावर तत्काळ चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विविध विभागांशी संबंधित प्रश्न एकाच ठिकाणी मांडण्याची संधी उपलब्ध होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
पंचायत समितीशी संबंधित अडचणी असलेल्या नागरिकांनी सोमवारी दुपारी ३ वाजता कोपरगाव तहसील कार्यालयात उपस्थित राहून आपल्या तक्रारी व मागण्या लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे आवाहन जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे. कमी वेळात जास्तीत जास्त नागरिकांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS