Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा जिल्ह्यात निवडणूकीचे वारे; जिल्हा बँकेच्या निमित्ताने व्ह्यूरचनेस प्रारंभ

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील मुदत संपत आलेल्या सर्व नगरपालिका, नगरपंचायती तसेच ग्रामपंचायतीच्या निवडणूका येत्या डिसेंबरनंतर जाहिर होणा

माहिती व जनसंपर्कच्या पुणे विभागीय प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न
मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याचा हल्ला; 24 कोकरांचा मृत्यू; 7 कोकरे जखमी; 4 कोकरे लंपास
वातावरणातील बदलानुसार शेतकर्‍यांनी पिक पध्दतील बदल करा : पर्यांवरण मंत्री आदित्य ठाकरे

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील मुदत संपत आलेल्या सर्व नगरपालिका, नगरपंचायती तसेच ग्रामपंचायतीच्या निवडणूका येत्या डिसेंबरनंतर जाहिर होणार आहेत. त्यामुुळे जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातील गाव पुढार्‍यांसह आमदार, खासदारांनी आपला गड शाबुत ठेवण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीच्या निमित्ताने नेत्यांनी व्ह्यूवरचनेस प्रारंभ केला आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली होती. कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर सहकार विभागाने संचालक मंडळाला मुदत वाढ दिली होती. कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाल्याने राज्य अनलॉक होवू लागले आहे. त्यामुळे जनतेचे सर्व व्यवहार नियमित होवू लागले आहेत. त्यामुळे रखलेली निवडणूक घेण्याची सहकार विभागाने योजना बनविली आहे. या निवडणूकीच्या माध्यमातून गाव पुढार्‍यांचे महत्व वाढले आहे. आमदार-खासदार आता त्यांना लवून सलाम करून माझाच ठराव करण्याची विनंती करू लागले आहेत. तसेच मुदत संपलेल्या नगरपालिका, नगरपंचायती तसेच ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे गावा-गावात निवडणूकीच्या व्ह्यूवरचनेला प्रारंभ झाला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनुशंगाने गावागावातील गट-तट आपला गड राखून ठेवण्याच्या तयारीला लागले आहेत.
निवडणूकीची तयारी करण्याच्या अनुशंगाने काही जणांनी आपल्या मतदारांना येणार्‍या अडचणी तसेच गावातील कोरोना लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग घेतल्याचे दिसून येत आहे. लसीकरणानिमित्ताने लोकांच्या मनात घर करण्याचे काम सुरु आहे. असे केले तरी ग्रामीण भागातील राजकारण व शहरी भागातील राजकारणामध्ये जमिन आसमानचा फरक आहे. ग्रामीण भागातील नेते मतदारांची नाळ ओळखून आहेत. त्यामुळे बाटली, बंडल वेळप्रसंगी नळीचा वापर करून मतदारांना अमिषाचा रवा खायला घालतात. ही आताच्या निवडणूकामध्ये नियमितपणे होत असणारी प्रथा बनली आहे. याला अपवाद शहरातील जनता असल्याचे पहावयास मिळत आहे. ही जनता मला कोणाशी घेणे-देणे नाही, मी-माझा याच तोर्‍यात असते. त्याचा फटका त्यांना नेहमीच बसत असतो. जिल्हा बँकेच्या निमित्ताने आता आपा-आपले गड राखण्याच्या तयार्‍या सुरु झाल्या आहेत. या निमित्त डिसेंबरनंतर कधीही निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याने गटा-तटाच्या राजकारणातून जिरवा-जिरवीचे राजकारण सुरु झाले आहे.
अशातच आता राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप व शिवसेना या चार पक्षाची सातारा जिल्ह्यात चलती आहे. त्यामुळे जिल्हा बँकेत आमचे किती संचालक असणार? याकडे सर्वांचा कल असल्याचे दिसून येत आहे. गेल्या निवडणूकीत सध्याचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या जिल्हा बँकेतील प्रवेशामुळे राष्ट्रवादीच्या एकहाती सत्तेला सुरुंग लागला होता. त्यातून मिटिंगसाठी खिमा किती आणला जातो. तसेच संचालकांच्या नाष्ट्यासाठी किती खर्च केला जातो हे सामान्य जनतेसमोर आले. आता भाजप वगळता काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेने यांची राज्याचे सरकार बनविताना महाविकास आघाडी आहे. तीच आघाडी जिल्हा बँकेत होवू शकत नाही. कारण सर्वाधिक मतदार असलेले भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना घेऊन महाविकास आघाडीने पॅनेल बनविण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून राज्यसभेचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांना मात्र स्वबळावर निवडणूक लढवून जिल्हा बँकेचे संचालक पद राखण्याची वेळ आली आहे. यापूर्वीच्या निवडणूकीत तगडा विरोधक नव्हता त्यामुळे निवडणूकीत तशी काही उलाढाल झाली नव्हती. मात्र, यंदाच्या निवडणूकीत संचालक मंडळाच्या निवडणूकीत यासर्व गोष्टी झाल्याचे पहावयास मिळणार आहे.

COMMENTS