Homeकृषी

शेतकर्‍यांनी खरीप पेरणीपूर्वी बियाण्यांवर बीजप्रक्रिया करावी-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे

बीड : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाला असून, पेरणीची लगबग सुरू झाली आहे. विविध कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी प्रतिबं

फेसबुक पोस्ट प्रकरणात कफील खान यांची निर्दोष मुक्तताअ‍ॅड. इमरान खाजा यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे खटल्याचा निकाल आरोपीच्या बाजूने
जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षेखा.बजरंग सोनवणेंनी बीडचा आवाज दिल्लीत घुमवला
महिला कला महाविद्यालयात मा. अशोकरावजी पाटील (दादा) यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
Beed Agriculture News : बियाण्यांची कृत्रिम टंचाई केल्यास कारवाई करणार


बीड : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाला असून, पेरणीची लगबग सुरू झाली आहे. विविध कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बीजप्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे यावर्षी खरीप पेरणी करताना शेतकर्‍यांनी बियाण्यांची थेट पेरणी न करता, बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, असे आवाहन बीडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
बियाणांच्या माध्यमातून किंवा जमिनीतून होणारा कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापनात बीजप्रक्रिया हा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी मार्ग असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. बियाण्यांना पेरणीपूर्वी औषध किंवा जैविक खतांची प्रक्रिया केल्यास पिकांचे सुरुवातीच्या काळात मोठे संरक्षण होते. पिकनिहाय बियाण्याच्या वजनानुसार बुरशीनाशक, कीटकनाशक आणि जिवाणू खतांचे प्रमाण ठरलेले असते. याबाबतच्या अधिक माहितीसाठी व शिफारसींसाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी आपल्या भागातील सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहनही कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.  बीजप्रक्रिया करण्याचे फायदे – बियाणांपासून प्रसारित होणार्‍या आणि जमिनीत असणार्‍या बुरशीजन्य रोगापासून संरक्षण मिळते. जमिनीत असणार्‍या किडींचा तसेच पेरणी पासून 30-35 दिवस रस शोषक किडी आणि खोड माशी यांचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते. कीड व रोग व्यवस्थापनेच्या खर्चात बचत होते. बियाण्याची उगवण क्षमता वाढवते. जैविक खताच्या प्रक्रियेमुळे जिवाणू झाडांना, पिकांना अन्नद्रव्य लवकर उपलब्ध करून देतात, त्यामुळे झांडाची, पिकांची वाढ जोमाने होते. बीजप्रक्रिया करतेवेळी घ्यावयाची काळजी – बीजप्रक्रिया करण्यासाठी हातमोजे, मारक, चष्मा या सारख्या व इतर संरक्षण करणार्‍या बाबीचा वापर करावा. बीजप्रक्रिया तळवटावर किंवा बारदाण्यार किंवा सीड ड्रम, यंत्राद्वारे सावलीत करावी. बियाणे हाताने चोळू नये, कापडाने किंवा पिशवीमध्ये एकत्र मिसळून घ्यावे. रासायनिक आणि जैविक बीजप्रक्रिया एकत्र करू नयेत. विकत घेतलेल्या बियाण्यांवर बुरशीनाशक आणि कीटकनाशकांची बीजप्रक्रिया केली असल्यास अशा बियाण्यांवर फक्त जिवाणू खतांची बीजप्रक्रिया करावी. बीजप्रक्रियेचा क्रम असा असावा, प्रथम रासायनिक बुरशीनाशक, त्यानंतर रासायनिक कीटकनाशक व त्यानंतर 3 ते 4 तासांनी जैविक बुरशीनाशक व जैविक कीटकनाशके त्यानंतर 3 ते 4 तासांनी रायझोबिअम किया अ‍ॅझोटोबैंक्टर (जिवाणू संवर्धक) सर्वात शेवटी केएमबी किवा पीएसबी (जिवाणू संवर्धक) यांची बीजप्रक्रिया करावी. नैसर्गिक शेतीचा अवलंब करत असताना फक्त बीजामृताचीच बीजप्रक्रिया करावयाची आहे. नैसर्गिक शेती करताना रासायनिक बुरशीनाशक, रा. कीटकनाशक व जैविक बुरशीनाशक व जै. किटकनाशके व जिवाणू संवर्धक यांची बीजप्रक्रिया करु नये. असेही कळविले आहे.

COMMENTS