Homeताज्या बातम्या

नांदेड विधान परिषद निवडणुकीतील सस्पेन्स उद्या संपणार? उमेदवारी माघारीच्या अंतिम दिवशी राजकीय चित्र स्पष्ट होणार

नांदेड : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला राजकीय सस्पेन्स अखेर उद्या संपण्य

राष्ट्रवादीमुळेच आमची घडी बसली-मोईन मास्टरअजितदादांनी सामान्य भीमकन्येला खुर्चीत बसवून सामाजिक न्यायाचा विचार जपला – प्रेमलताताई पारवे
बारामती पोटनिवडणुकीत आता पेच वाढला…
महागाई, कर्जमाफीवरून अधिवेशन गाजणार !
Nanded Vidhan Parishad Election | नांदेड विधान परिषद निवडणूक ८ केंद्रांवर  मतदान

नांदेड : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला राजकीय सस्पेन्स अखेर उद्या संपण्याची चिन्हे आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत उद्या दुपारी तीन वाजता संपणार असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत समीकरणांचे खरे चित्र त्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

महायुतीच्या वतीने माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीसमोर अंतर्गत आव्हान निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीकडून हा वाद सोडवण्यासाठी समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दुसरीकडे महाविकास आघाडीच्या छावणीतही काँग्रेस पक्षाच्या वतीने दोन वेगवेगळ्या उमेदवारी अर्जांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. रामदास पाटील सुमठाणकर आणि माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर या दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अधिकृत उमेदवार कोण, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. निवडणुकीच्या प्रारंभी काँग्रेस, शरद पवार गटाची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात व्यापक एकजूट निर्माण होण्याची चर्चा होती; मात्र अर्ज दाखल करतानाच या एकजुटीतील फटी उघड झाल्या आहेत. त्यामुळे उद्या दुपारी तीन वाजेनंतरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निर्णायक घडामोडींकडे खिळले आहे.

COMMENTS