श्रीगोंदा : श्रीगोंदा पंचायत समिती कार्यालयामधील कनिष्ठ सहाय्यक अहमद इनामदार यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित गौरव समारंभ रविवारी (दि. ३१ मे) आ

श्रीगोंदा : श्रीगोंदा पंचायत समिती कार्यालयामधील कनिष्ठ सहाय्यक अहमद इनामदार यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित गौरव समारंभ रविवारी (दि. ३१ मे) आढळगाव येथे पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिक्रमा शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा तथा श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या मातोश्री प्रतिभा पाचपुते उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते अहमद इनामदार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या पत्नी नूरजहाँ इनामदार यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रतिभा पाचपुते म्हणाल्या की, “अहमद इनामदार यांनी पंचायत समिती कार्यालयात कार्यरत असताना अत्यंत प्रामाणिकपणे व कर्तव्यनिष्ठेने जबाबदाऱ्या पार पाडल्या. ग्रामीण भागातून विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची आपुलकीने विचारपूस करून त्यांना आवश्यक ती मदत व सेवा देण्याचा त्यांनी नेहमी प्रयत्न केला. त्यांच्या कार्याची आठवण सर्वांना कायम राहील. निवृत्तीनंतरचे त्यांचे आयुष्य निरोगी, आनंदी व समाधानकारक जावो,” अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
सत्काराला उत्तर देताना अहमद इनामदार यांनी आपल्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा दिला. “कार्यालयातील अधिकारी, सहकारी कर्मचारी व नागरिक यांच्या सहकार्यामुळेच मला माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडता आली. शासकीय सेवेतून निवृत्त होत असलो तरी सामाजिक क्षेत्रातील कार्यात पुढेही सक्रिय राहणार आहे,” असे त्यांनी सांगितले.
या सेवापूर्ती गौरव सोहळ्यास परिक्रमा शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्ष प्रतिभा पाचपुते, अनिल ठवाळ, नगरसेवक अमीनभाई शेख, पत्रकार उत्तम राऊत, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष माधव बनसुडे, नगरसेवक प्रशांत गोरे, शब्बीर बेपारी, विलास भैलुमे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
\\\\\\\\\\\\\\\\\

COMMENTS