Homeताज्या बातम्या

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्यकर्त्यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण; ५० हून अधिक जणांचा सहभाग

देवळाली प्रवरा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) अहिल्यानगर शहर शाखेतर्फे ३० व ३१ मे २०२६ रोजी दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण व

‘एसएसजीएम’च्या सहा विद्यार्थ्यांची रिसर्च असोसिएटसाठी निवड; कोपरगाव महाविद्यालयात प्लेसमेंट ड्राइव्ह
सोनमाळी कन्या विद्यालयाचा ‘कर्मवीर’ पारितोषिकाने गौरव
‘एसएसजीएम’मध्ये माजी विद्यार्थी संघ कार्यकारिणीची बैठक उत्साहात; आमदार विवेक कोल्हे यांच्यासह मान्यवरांचे अभिनंदन

देवळाली प्रवरा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) अहिल्यानगर शहर शाखेतर्फे ३० व ३१ मे २०२६ रोजी दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गात जिल्ह्यातील ५० हून अधिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

जिल्हाध्यक्ष अरुण कडू पाटील आणि कार्याध्यक्ष मधुकर अनाप यांच्या पुढाकारातून आयोजित या वर्गात महाराष्ट्र अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. अस्मिता बालगावकर, रमेश माने, चंद्रकांत ऊळेकर आणि हेमंत धानोरकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अरुण कडू पाटील यांनी वाढती बुवाबाजी, अंधश्रद्धा आणि अनिष्ट रूढी-परंपरा ही समाजासाठी चिंतेची बाब असल्याचे सांगत या विरोधातील सामाजिक चळवळ अधिक प्रभावी करण्याचे आवाहन केले.

या दोन दिवसांत कार्यकर्त्यांची भूमिका, आचारसंहिता, मन आणि मानसिक आजार, स्त्रिया व अंधश्रद्धा, वैज्ञानिक दृष्टिकोन, ज्योतिषशास्त्रातील फोल दावे, तसेच जादूटोणा व सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा आदी विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, उत्तर विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे, कार्यालय प्रमुख भाऊ पांडुळे, रमेश शिंदे आदी मान्यवरांनी भेट दिली. शहराध्यक्ष संतोष कदम, कार्याध्यक्ष राजेंद्र कर्डिले, हरेश्वर साळवे, दिलीप जगताप, रमेश भांड, संतोष पालघडमल आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोनाली शिंदे आणि नलिनी गायकवाड यांनी केले.

COMMENTS