Homeताज्या बातम्या

राशीनमध्ये अनधिकृत होर्डिंगचा बळी; २४ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

कर्जत : अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन येथे अनधिकृत होर्डिंगमुळे एका २४ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घड

बीड शहरातील शांहीशाह वली दर्गा परिसरातील अतिक्रमण हटविण्याची मागणी; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
घरगणनेत भटक्या-विमुक्तांच्या पालांचा समावेश होईल का? ऍड. अरुण जाधव यांचा शासनाला सवाल
‘गणेश’ परिसराच्या वतीने आमदार विवेक कोल्हे यांचा उद्या भव्य नागरी सत्कार

कर्जत : अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन येथे अनधिकृत होर्डिंगमुळे एका २४ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी रात्री झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पावसादरम्यान लोखंडी होर्डिंग कोसळून अमित मोहन सुकाळे (वय २४, रा. राशीन) याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी विकास लहू सायकर याच्याविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी रात्री कर्जत तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. राशीन येथील महात्मा फुले चौक परिसरात उभारण्यात आलेल्या मोठ्या लोखंडी होर्डिंगवर चोंडी येथील कार्यक्रमाचे बॅनर लावण्यात आले होते. पावसासह जोरदार वारे सुरू असताना बॅनर फाटू नये म्हणून अमित सुकाळे याला होर्डिंगवर चढून बॅनरला छिद्रे पाडण्यास सांगण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. अमित होर्डिंगवर असतानाच लोखंडी सांगाडा कोसळल्याने तो गंभीर जखमी झाला व त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर राशीन परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनधिकृत होर्डिंगमुळे आणखी किती निष्पाप नागरिकांचे जीव जाणार, असा तीव्र प्रश्न उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी मृताचे नातेवाईक राजू दौलत मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी विकास लहू सायकर याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला आहे. या होर्डिंगसाठी अधिकृत परवानगी होती का, याची चौकशी सुरू असून दोषी आढळणाऱ्या इतर व्यक्तींवरही गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती तपास अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक मुलानी यांनी दिली.

COMMENTS