Homeताज्या बातम्या

श्रीलंकेमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी दरवाढ; महागाईचा भडका उडण्याची शक्यता

कोलंबो : पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि जागतिक ऊर्जा पुरवठ्यात निर्माण झालेले अडथळे यामुळे भारताचा शेजारी देश असलेल्या श्रीलंकेत इंधन दरवाढीचा मो

युद्धविराम आणि आशियाई देशांचा सुटकेचा निःश्‍वास
भारताची रशियन तेल आयात विक्रमी पातळीवर
होर्मुझची कोंडी सुटणार? तेल इंधनामुळे जागतिक अर्थव्यवस्था ठप्प होण्याची शक्यता
Fuel Price : पेट्रोल 434 तर डिझेल 407 रुपये लिटर, भारताच्या शेजारील देशात  महागाईने हाहाकार - Marathi News | Sri lanka fuel price hike petrol at 434  diesel at 407 amid iran us tension energy ...

कोलंबो : पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि जागतिक ऊर्जा पुरवठ्यात निर्माण झालेले अडथळे यामुळे भारताचा शेजारी देश असलेल्या श्रीलंकेत इंधन दरवाढीचा मोठा भडका उडाला आहे. सरकारी मालकीच्या ‘सीलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशन’ने (CPC) रविवारी (दि. ३१) इंधनाच्या नव्या दरांची घोषणा केली. ही दरवाढ मध्यरात्री १२ वाजल्यापासून लागू झाली आहे. या निर्णयामुळे श्रीलंकेतील सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर मोठा भार पडणार असून, तेथील महागाई अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

सीलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलच्या दरात ५.८५ टक्क्यांनी, तर डिझेलच्या दरात ३.८३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार, डिझेल प्रति लिटर १५ रुपयांनी महागले असून, आता त्याची किंमत ४०७ श्रीलंकन रुपयांवर पोहोचली आहे. पेट्रोलच्या किमतीत थेट २४ रुपयांची भर पडली असून आता पेट्रोलचा दर ४३४ रुपये प्रति लिटर इतका झाला आहे. यासोबतच रॉकेलच्या (केरोसीन) दरातही २० रुपयांची वाढ करण्यात आली असून, ते आता २८५ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध होणार आहे.

गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत इंधन दरात झालेली ही पाचवी मोठी वाढ आहे. १ मार्च ते ३१ मे या तीन महिन्यांच्या काळात पाचवेळा इंधन दरवाढ करण्यात आली आहे. विशेषतः मार्च महिन्याच्या पहिल्या २२ दिवसांतच तीनदा दरवाढ करण्यात आली होती. फेब्रुवारीच्या अखेरीस पेट्रोलचा दर २९३ रुपये प्रति लिटर होता, जो अवघ्या काही महिन्यांत ४३४ रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता जनतेला इंधनाचा वापर कमी करण्याचे आवाहन पुन्हा एकदा केले आहे. पश्चिम आशियातील अस्थिरतेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण पडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

श्रीलंकेच्या आर्थिक संकटात भर म्हणून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत श्रीलंकेच्या चलनातही मोठी घसरण झाली आहे. केंद्रीय बँकेच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात श्रीलंकेच्या रुपयाचे मूल्य मोठ्या प्रमाणात खालावले आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात निर्माण झालेले अडथळे आणि वाढते दर यामुळे पेट्रोलियम कंपन्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. या वाढत्या खर्चाचा भार एकट्या कंपन्यांवर पडू नये, यासाठी इंधनाचे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, भारत आणि श्रीलंका यांच्यातील इंधन दरवाढीची तुलना केल्यास, भारतातही इंधन दरात वाढ झाली असली तरी, श्रीलंकेतील ही दरवाढ अत्यंत तीव्र असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक आव्हानांचा सामना करत असून, या इंधन दरवाढीमुळे देशातील वाहतूक, जीवनावश्यक वस्तूंची ने-आण आणि एकूणच महागाईचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

COMMENTS