Homeताज्या बातम्या

बकरी ईदनिमित्त शिर्डीत स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गौरव; मुस्लिम बांधव व कलाम संस्थेचा पुढाकार

शिर्डी : बकरी ईद सणानिमित्त शहरात स्वच्छता व आरोग्यदायी वातावरण राखण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शिर्डी नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्या

वादळाने झालेल्या नुकसानीची आमदार आशुतोष काळेंकडून पाहणी; प्रशासनाला तातडीने पंचनाम्यांचे आदेश
म्हातारपिंपरी-मढेवडगाव रस्त्याचे सीमांकन; अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्नाला अखेर मार्ग
तहसील कार्यालयासमोर कांदे ओतून आंदोलन; अकोलेत किसान सभेची जोरदार निदर्शने

शिर्डी : बकरी ईद सणानिमित्त शहरात स्वच्छता व आरोग्यदायी वातावरण राखण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शिर्डी नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा (स्वच्छता दूत) समस्त मुस्लिम बांधव आणि भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील मशिदी, ईदगाह परिसर तसेच विविध भागांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने विशेष नियोजन केले होते. सणाच्या पूर्वतयारीपासून ते सणानंतरच्या स्वच्छता व्यवस्थेपर्यंत या स्वच्छता दूतांनी अत्यंत जबाबदारीने आणि परिश्रमपूर्वक आपले कर्तव्य पार पाडले. त्यांच्या या अथक परिश्रमांमुळे बकरी ईदचा सण स्वच्छ, सुरक्षित आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यास नागरिकांना मोठी मदत झाली.

शिर्डी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्वच्छ, सुंदर शहर घडविण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी नगरपरिषद प्रशासन सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. स्वच्छता दूतांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित कार्यक्रमाला शिर्डी शहरातील मुस्लिम बांधव, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेचे संस्थापक मेहमूब सय्यद आणि अध्यक्ष दादाभाई इनामदार प्रामुख्याने उपस्थित होते.

COMMENTS