Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 तापी नदी पात्रात पडलेल्या ट्रक रात्र उलटूनही सापडेना

युद्ध पातळीवर शोध कार्य सुरू

धुळे प्रतिनिधी - धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील सावळदे पुलावरून तापी नदी पात्रात रात्री झालेल्या भीषण अपघातानंतर ट्रक थेट अपघात ग्

सोनम कपूरच्या चिमुकल्याचं नाव आहे खूपच युनिक
राज्य सरकारकडून आरोग्य विभागासाठी बंपर भरतीची घोषणा
नाटेगावातील शेतकर्‍यांचे उपोषण मागे

धुळे प्रतिनिधी – धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील सावळदे पुलावरून तापी नदी पात्रात रात्री झालेल्या भीषण अपघातानंतर ट्रक थेट अपघात ग्रस्त होऊन तापी नदीपात्रात कोसळला असल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. 12 तास उलटून गेले असले तरीही ट्रकचा अद्याप सापडलेला नाही. मात्र बुडालेल्या ट्रक संदर्भात सोधकार्य दरम्यान महत्त्वपूर्ण कागदपत्र पोलिसांच्या हाती लागले आहेत.कागदपत्रांमधील माहितीनुसार, ट्रकचालकाचं नाव दीपक कुमार (वय 40) असून तो राजस्थानच्या कोटा येथील रहिवाशी आहे. ट्रक चालकाचं ड्रायव्हिंग लायसन्स पोलिसांच्या हाती लागलं आहे. मात्र या अपघातामध्ये किती लोकांची जीवितहानी झाली आहे. याचा तपास अजून लागू शकलेला नाही.शिरपूर जवळील सावळदे पुलावर काल रात्री क्रुझर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला होता. या अपघातात 10 ते 15 जखमी झाले आहेत. त्यापैकी किरकोळ जखमी असलेल्यांना प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले असून अद्यापही चार जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.भीषण अपघातानंतर सावळदे पुलाचा कठडा तोडून भरधाव वेगाने येणारा ट्रक थेट तापी नदीपात्रात कोसळला. बुडालेला ट्रक अद्यापही नदीपात्रातच आहे. यामध्ये ट्रक चालकासह आणखी किती जण आहेत याचा अद्यापही अंदाज लागू शकलेला नाही.

COMMENTS