Homeताज्या बातम्या

पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड पशुपालकांसाठी ‘मृगजळच’

अहिल्यानगर : पशुपालकांना खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने 'पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड' योजना सुरू केली. मात्र बँकांची

अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात लग्नकार्यासाठी नेलेले लाखो रुपयांचे दागिने हडप
सोशल मीडियाच्या वादातून हल्ला
काशिनाथ दिवटे यांचे निधन
किसानों के लिए खुशखबरी, पशुधन किसान क्रेडिट कार्ड योजना के तहत मिलेगा लोन,  ऐसे करें आवेदन - Pasgudhan credit card scheme for farmers get loan up to  three lakh for animal husbandry

अहिल्यानगर : पशुपालकांना खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने ‘पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड’ योजना सुरू केली. मात्र बँकांची उदासीनता, कर्जमाफीच्या प्रतीक्षेतील शेतकरी थकबाकीदार झाल्याने तसेच इतर अडथळ्यांमुळे अद्याप जिल्ह्यातील एकही पशुपालकाला कर्ज मंजूर झालेले नाही.

‘पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड’ साठी अहिल्यानगर जिल्ह्याला ८० हजारांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, केवळ ३८४ पशुपालकांनी या कर्ज सुविधेसाठी अर्ज केले आहेत. ही सर्व प्रकरणे राष्ट्रीयीकृत बँका व जिल्हा सहकारी बँकेकडे मंजुरीसाठी पाठवली गेली. मात्र, या बँकांनी अद्याप एकही प्रकरण मंजूर केले नसल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडेही संपर्क साधला आहे.

पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांना पशुधनाची देखभाल व दैनंदिन खर्चासाठी व्याज सवलतीसह कर्ज सुविधा उपलब्ध केली आहे. ज्यांच्याकडे किसान क्रेडिट कार्ड नाही त्यांना १.६० लाखांपर्यंत विनातारण कर्ज उपलब्ध होणार आहे. दूध संस्थेची हमी असल्यास ही मर्यादा ३ लाखांपर्यंत वाढवता येते. ज्या पशुपालकांकडे आधीच किसान क्रेडिट कार्ड आहे त्यांनाही पतमर्यादा वाढवून ३ लाखांपर्यंत लाभ घेता येणार आहे.

कर्जाचा मूळ व्याजदर ९ टक्के असला तरी नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून ३ टक्के व राज्य सरकारकडून ४ टक्के अशी एकूण व्याज सवलत मिळते. बँकांकडूनही २ टक्के सवलत दिल्याने नियमित परतफेड करणाऱ्या पशुपालकांना शून्य टक्के व्याजदराचा लाभ मिळू शकतो. यंदा सन २०२६-२७ पासून ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने’तून या कार्डद्वारे खेळत्या भांडवलाचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी लाभार्थी थकबाकीदार नसावा, ही प्रमुख अट आहे.

COMMENTS