Homeताज्या बातम्या

माहूर तहसील कार्यालयात ई-वाहन चार्जिंग स्टेशन; हरित ऊर्जेकडे आणखी एक पाऊल

माहूर : नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी (ई-व्ही) चा

एससी प्रवर्गाचे उपवर्गीकरण करून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या; लहुजी शक्ती सेनेची मागणी
कुंडलवाडीत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन; शांतता राखण्याचे आवाहन
ज्येष्ठ समाजसेवक भीमरावजी दुधारे यांचे हृदयविकाराने निधन; भोकर तालुक्यासह नांदेड जिल्ह्यात शोककळा

माहूर : नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी (ई-व्ही) चार्जिंग स्टेशन उभारण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत माहूर तहसील कार्यालयातही ई-वाहन चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या सुविधेमुळे शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच विविध कामांसाठी तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग सहज करता येणार आहे, अशी माहिती तहसीलदार अभिजित जगताप यांनी दिली. माहूर हे राज्यातील एक महत्त्वाचे धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे. येथील श्री रेणुकामाता मंदिरा दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येत असतात. इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर माहूर येथे सुरू झालेली ही सुविधा भाविक, पर्यटक आणि स्थानिक वाहनधारकांसाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे.

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि पर्यावरण संरक्षणाची गरज लक्षात घेता स्वच्छ व पर्यायी ऊर्जेचा वापर वाढविणे आवश्यक बनले आहे. जिल्हा प्रशासनाचा हा उपक्रम हरित ऊर्जा, प्रदूषणमुक्त वाहतूक व्यवस्था आणि शाश्वत विकासाला चालना देणारा असून, नांदेड जिल्ह्याच्या पर्यावरणपूरक वाटचालीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.

COMMENTS