Homeताज्या बातम्या

कर्नाटकात सिद्धरामैया यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

बेंगळुरू : कर्नाटकच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या असून मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. पक्षश्र

काँग्रेस ‘परजीवी’ पक्ष असून विश्वासघातकी; पंतप्रधान नरेंद्र मोदींची बंगळुरूतील सभेत कडाडून टीका
नेतृत्वबदलाने काय साध्य होणार?
कर्नाटकात खातेवाटपावरून सरकारला धक्कामंत्रीपदाचा राजीनामा देत रामलिंगा रेड्डींची नाराजी उघड
Karnataka CM Resignation: कर्नाटकात मोठा उलटफेर! अखेर सिद्धरमय्या यांनी  सोडलं मुख्यमंत्रीपद; ब्रेकफास्ट करता करताच घोषणा - Marathi News | Big  political twist in karnataka ...

बेंगळुरू : कर्नाटकच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या असून मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. पक्षश्रेष्ठींच्या निर्देशानुसार हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे राज्यातील सत्तांतराचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

बेंगळुरू येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सिद्धरामैया म्हणाले की, पक्षाने जेव्हा सांगितले तेव्हा पदाचा त्याग करेन, अशी भूमिका त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केली होती. पक्षश्रेष्ठींकडून निर्देश मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ राजीनामा सादर केल्याचे त्यांनी सांगितले. राज्यपाल थावरचंद गेहलोत हे सध्या बेंगळुरूबाहर असल्याने सिद्धरामैया यांनी आपले राजीनामा पत्र राज्यपालांच्या सचिवांकेडे सुपूर्द केले. राज्यातील घटनात्मक प्रक्रियेनुसार राज्यपालांच्या मंजुरीनंतरच राजीनामा औपचारिकरीत्या स्वीकारला जाईल. तोपर्यंत विद्यमान मुख्यमंत्री कार्यरत राहू शकतात.

राजीनाम्यापूर्वी सिद्धरामैया यांनी आपल्या निवासस्थानी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आपल्या निर्णयाची माहिती मंत्र्यांना दिली. बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सिद्धरामैया यांना वंदन केले. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी परस्परांना आलिंगन देत एकोप्याचा संदेश दिला. या भेटीमुळे सत्तांतराची प्रक्रिया सौहार्दपूर्ण वातावरणात होत असल्याचे चित्र समोर आले. पत्रकार परिषदेत पुढील मुख्यमंत्री कोण असतील, याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. मात्र राज्यातील वरिष्ठ मंत्री एच. के. पाटील यांनी डी. के. शिवकुमार यांच्या नावावर व्यापक सहमती झाल्याचे संकेत दिले. त्यामुळे कर्नाटकच्या पुढील मुख्यमंत्रीपदासाठी शिवकुमार यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आले आहे.

COMMENTS