Homeताज्या बातम्या

कुंडलवाडीत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन; शांतता राखण्याचे आवाहन

कुंडलवाडी : आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने मुख्य मार्गांवरून पथसंचलन (र

ज्येष्ठांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही : पो.नि.गायकवाड
छत्रपती संभाजीनगरमध्ये गुटखा माफियांची मुजोरी! FDA च्या महिला अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करत जप्त केलेला ट्रक पळवला; वाळूज पोलिसांकडून दोन मुख्य आरोपींना अटक
तोहीद खान हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावीकामरान खान शिवसेना अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख बीड

कुंडलवाडी : आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने मुख्य मार्गांवरून पथसंचलन (रूट मार्च) करण्यात आले. धर्माबादचे उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी ६:१० ते ७:०० वाजेदरम्यान हे पथसंचलन पार पडले.

पोलीस स्टेशन कुंडलवाडी येथून या पथसंचलनाची सुरुवात झाली. त्यानंतर दर्गा गल्ली, मुख्य बाजारपेठ, जोड मारुती मंदिर, संत गोरा कुंभार चौक, हेडगेवार चौक आणि बस स्टँड परिसरातून मार्गक्रमण करत पुन्हा पोलीस स्टेशन येथे त्याची सांगता करण्यात आली. या संचलनामध्ये ३ पोलीस अधिकारी, १४ पोलीस अंमलदार तसेच १८ होमगार्ड जवानांनी सहभाग घेतला होता.

शहरातील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधत शांतता, सौहार्द व बंधुभाव कायम राखण्याचे आवाहन केले. बकरी ईद सण अत्यंत शांततामय वातावरणात पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क असून शहरात ठिकठिकाणी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिली आहे.

COMMENTS