Homeताज्या बातम्यादेश

ऑनलाईन गेमिंगमध्ये 4 हजार कोटींची हेराफेरी

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) परदेशात नोंदणी असलेल्या ऑनलाईन गेमिंग पोर्टल्सवर देशभरातील 25 ठिकाणी छापे घातले. या कारवाईत ईडीने  4 ह

काॅंग्रेसचा जातनिहाय जनगणनेचा अजेंडा आणि…. 
सटाणा ट्रामा केअर व डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयास मिळणार नवीन रुग्णवाहिका
पृथ्वी असेपर्यंत छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याची हिंमत होऊ नये बावनकुळे यांची अपेक्षा

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) परदेशात नोंदणी असलेल्या ऑनलाईन गेमिंग पोर्टल्सवर देशभरातील 25 ठिकाणी छापे घातले. या कारवाईत ईडीने  4 हजार कोटी रुपयांची हेराफेरी पकडली आहे.
ईडीने विदेशी चलन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी देशात कार्यरत असलेल्या परदेशी-नोंदणीकृत ऑनलाइन गेमिंग वेबसाइट आणि कंपन्यांवर देशातील विविध राज्यांमध्ये 25 ठिकाणी छापे घातले. यातून सुमारे 4 हजार कोटी रुपयांची हेराफेरी पकडली आहे. हे पैसे बेकायदेशीररित्या परदेशात पाठवले गेल्याचे उघडकीस आणले आहे.परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदींनुसार केलेल्या या कारवाईदरम्यान 55 बँक खाती गोठवली. तसेच 19.55 लाख रुपये आणि 2,695 डॉलर्सहून अधिक रोख रक्कम जप्त केली आहे. ईडी कडून 22 आणि 23 मे रोजी दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि आंध्र प्रदेशमधील 25 परिसरांमध्ये झडती घेण्यात आली. या ऑनलाइन गेमिंग कंपन्या आणि वेबसाइट्स कुराकाओ, माल्टा आणि सायप्रस सारख्या छोट्या बेटांवर नोंदणीकृत असल्याचे आढळून आल्या. त्या सर्व प्रॉक्सी व्यक्तींच्या नावाने उघडलेल्या भारतीय बँक खात्यांशी जोडलेल्या आढळून आल्या आहेत. या संदर्भात पुढील तपासणी चौकशी सुरू असल्याचे ईडीच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

COMMENTS