बीड : शहरातील सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने पुढाकार घेणारे युवा उद्योजक वैभवशेट क्षीरसागर यांच्या वतीने भाजी मंडई परिसरातील 'जिव्हाळा बेघर निवा

बीड : शहरातील सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने पुढाकार घेणारे युवा उद्योजक वैभवशेट क्षीरसागर यांच्या वतीने भाजी मंडई परिसरातील ‘जिव्हाळा बेघर निवारा केंद्रा’तील गरजू लाभार्थ्यांना ‘राजे शिवाजी’ हा ऐतिहासिक चित्रपट पाहण्याची विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला.
यापूर्वीही वैभवशेट क्षीरसागर यांनी ‘बाईपण भारी देवा’ हा गाजलेला मराठी चित्रपट लाभार्थ्यांना दाखवून सामाजिक बांधिलकी जपली होती. व्यवसायात व्यस्त असूनही ते सातत्याने अशा सामाजिक कार्यात सक्रिय असतात. चित्रपट पाहण्यासाठी लाभार्थ्यांची जिव्हाळा बेघर निवारा केंद्रापासून संतोषीमाता टॉकीजपर्यंत ने-आण करण्याची तसेच चहा-पाण्याची आस्थेवाईक व्यवस्था त्यांच्या वतीने करण्यात आली.
या चित्रपटातून लाभार्थ्यांना नवचैतन्य आणि प्रेरणा मिळाल्याचे जिव्हाळा बेघर निवारा केंद्राचे संचालक अभिजित वैद्य, मुख्य व्यवस्थापक राजू वंजारे, काळजीवाहक छाया सरोदे आणि यश वंजारे यांनी सांगितले. दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून शासकीय मदत बंद असल्याने शहरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी जिव्हाळा बेघर निवारा केंद्रातील गरजू लाभार्थ्यांच्या मदतीसाठी सढळ हाताने सहकार्य करावे, असे आवाहन राजू वंजारे यांनी केले आहे.

COMMENTS