Homeताज्या बातम्या

न्याय मिळेपर्यंत आंबेडकर घराणे दळवी कुटुंबाच्या पाठीशी; आनंदराज आंबेडकर यांचा शब्द

बीड : शहरातील मातंग समाजातील युवक उमेश दळवी यांच्या झालेल्या निर्घृण हत्येप्रकरणी रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी गंभीर दखल घेतली

अतिक्रमण हटाव मोहिमेत भेदभाव नको; सर्वांवर समान कारवाई करा – रतन गुजर
सर्पदंशाने दहा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; ‘राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजने’पासून वंचित असल्याचा आरोप
चकलांबा पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन इंगळे यांच्या बदलीची मागणी; अवैध धंद्यांना संरक्षणाचा नागरिकांचा आरोप

बीड : शहरातील मातंग समाजातील युवक उमेश दळवी यांच्या झालेल्या निर्घृण हत्येप्रकरणी रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी दळवी कुटुंबीयांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांना धीर दिला. “या प्रकरणात पूर्ण न्याय मिळेपर्यंत आंबेडकर घराणे तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहील,” असा विश्वास त्यांनी कुटुंबीयांना दिला.

रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सूर्यवंशी तसेच बीड जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम गोटू वीर यांनी उमेश दळवी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन संपूर्ण घटनेची माहिती आनंदराज आंबेडकर यांना दिली. त्यानंतर आंबेडकर यांनी तात्काळ पोलीस प्रशासन, समाजकल्याण विभाग तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

दळवी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांच्या पत्नीला शासकीय नोकरी, तातडीची आर्थिक मदत तसेच घरकुल योजना मंजूर करण्यासाठी संबंधित विभागांनी त्वरित कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी समाजकल्याण अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यासोबतच पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून इतर संशयित आरोपींना ताब्यात घेण्याची, पुरवणी एफआयआरमध्ये संबंधितांची नावे समाविष्ट करण्याची आणि ॲट्रॉसिटी कायद्यान्वये कठोर कलमे लावण्याची मागणी त्यांनी केली. न्याय मिळेपर्यंत आंदोलनात्मक भूमिका कायम ठेवण्याचा निर्धार रिपब्लिकन सेनेने व्यक्त केला आहे.

COMMENTS