Homeताज्या बातम्या

अवैध वाळू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १८ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

सोनई : गणेशवाडी (ता. नेवासा) शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत तब्ब

‘गर्भलिंग’ प्रकरणी दोघांना अटक, आरोपींची संख्या २१ वर
पाथर्डी पोलिसांचा अवैध दारू व्यवसायावर छापा; गावठी हातभट्टी उद्ध्वस्त करून आरोपीला अटक
‘पैशाच्या व्यवहारासाठी अक्कल लागते’; तोतया पत्रकार झोंटिंगकडून पोलिसांच्या नावाने पैशांची मागणी अहिल्यानगर पोलिसांची बदनाम; पोलिसांनी दाखल करावा गुन्हा

सोनई : गणेशवाडी (ता. नेवासा) शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल १८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच जणांविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या आदेशानुसार, सोनई-गणेशवाडी मार्गावरून बेकायदा वाळूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गणेशवाडी शिवारात सापळा रचला. यावेळी एमएच २० ईएल ७९९०, एमएच १६ एई ३२३५ आणि एक विनाक्रमांकाचे वाहन अशा तीन गाड्यांमधून शासकीय वाळूची बेकायदा वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी वाहनांसह सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी पोलीस हवालदार सोमनाथ झांबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किरण बाबासाहेब सिसोदे (वय २५, रा. खलाल पिंपरी), विवेक दत्तात्रय शिंदे (वय १९, रा. निपाणी निमगाव), बाळासाहेब पुंडलिक नळगे (वय ४२, रा. बहिरवाडी) यांच्यासह फरार आरोपी आकाश तांबे (रा. पानेगाव) व राजू सुपनर (रा. अंमळनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किरणकुमार कबाडी, उपनिरीक्षक महादेव गुट्टे, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, सुयोग सुपेकर आणि रोहित येमुल यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार रवींद्र पवार करीत आहेत.

COMMENTS