Homeमहाराष्ट्र

ऊसतोड कामगारांच्या मुलांना ब्लॅंकेट वाटप 

कोपरगाव शहर : समाजातील गरजू घटकांसाठी केले जाणारे कार्य ही मदत नसून, ते आपले कर्तव्य आहे, या भावनेतून लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ऊसतोडी कामगारांच्या मुलांसाठी ३० ब्लँकेट्सचे वाटप करण्यात आले.  या उपक्रमाच्या निमित्ताने ऊसतोडी कामगारांच्या मुलांची वास्तव परिस्थिती समोर आली. थंडीच्या दिवसांत या लहानग्यांना मूलभूत सुविधांची मोठी गरज असल्याचे लक्षात आल्यानंतर क्लबच्या वतीने तातडीने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. समाजासाठी जे आवश्यक आहे, जिथे गरज आहे, तिथे पोहोचणे हेच लायन्स व लिओ क्लबचे ध्येय असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या वेळी लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे अध्यक्ष अक्षय गिरमे, संदीप राशीनकर, अक्षय बोरा, लिओ क्लबचे अध्यक्ष धीरज कराचीवाला, साम्यक फुलफगार, मानस नांगरे आदी उपस्थित होते.

नगरपरिषद आयोजित शिवजयंती उत्साहात होणार : नगराध्यक्ष संधान
शिवरायांचा कारभार हा लोककल्याणकारी होता : माजी आ. काळे
कोपरगाव शहराच्या विकासाला नवी दिशा

कोपरगाव शहर : समाजातील गरजू घटकांसाठी केले जाणारे कार्य ही मदत नसून, ते आपले कर्तव्य आहे, या भावनेतून लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ऊसतोडी कामगारांच्या मुलांसाठी ३० ब्लँकेट्सचे वाटप करण्यात आले.

 या उपक्रमाच्या निमित्ताने ऊसतोडी कामगारांच्या मुलांची वास्तव परिस्थिती समोर आली. थंडीच्या दिवसांत या लहानग्यांना मूलभूत सुविधांची मोठी गरज असल्याचे लक्षात आल्यानंतर क्लबच्या वतीने तातडीने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. समाजासाठी जे आवश्यक आहे, जिथे गरज आहे, तिथे पोहोचणे हेच लायन्स व लिओ क्लबचे ध्येय असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या वेळी लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे अध्यक्ष अक्षय गिरमे, संदीप राशीनकर, अक्षय बोरा, लिओ क्लबचे अध्यक्ष धीरज कराचीवाला, साम्यक फुलफगार, मानस नांगरे आदी उपस्थित होते.

COMMENTS