Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रशासकीय काळात तीनपट कचरा दाखवून वाढीव टेंडर? श्रीगोंदा नगर परिषदेत अनियमिततेचा आरोप; संभाजी ब्रिगेडचा आंदोलनाचा इशारा

श्रीगोंदा : श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये प्रशासकीय काळात प्रत्यक्षापेक्षा तब्बल तीनपट कचरा दाखवून वाढीव टेंडर काढण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला अ

बहुजन समता पार्टीच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी दिगंबर खुडे यांची नियुक्ती
शेवगावात सैनिक परिवार स्नेहसंमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० हून अधिक माजी सैनिक व कुटुंबीयांची उपस्थिती
अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा अंगीकारण्याची गरज; चौंडीत जयंती महोत्सव उत्साहात

श्रीगोंदा : श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये प्रशासकीय काळात प्रत्यक्षापेक्षा तब्बल तीनपट कचरा दाखवून वाढीव टेंडर काढण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या माध्यमातून नागरिकांच्या कररूपाने जमा झालेल्या पैशाचा अपव्यय झाला असून नेमका फायदा कोणाला झाला, असा सवाल नागरिकांसह विविध संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा शहराची लोकसंख्या सध्या सुमारे ४२ हजारांच्या आसपास आहे. शहरातून दररोज अंदाजे आठ टन कचरा डेपोवर जमा होत असल्याची माहिती असताना, मागील पाच वर्षांच्या कचऱ्याचा अंदाज मांडताना दररोज तब्बल १२ टन कचरा दाखवण्यात आला. म्हणजेच प्रतिदिन सुमारे चार टन अतिरिक्त कचरा दाखवून टेंडरची किंमत वाढवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

यासंदर्भात कचऱ्याचे एकूण प्रमाण अंदाजे १७ हजार ५५२ टन दाखवण्यात आले आहे. मात्र कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अधिकृत वजन मोजण्यात आले नसल्यामुळे संपूर्ण प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. साडेआठ गुंठे क्षेत्रफळामध्ये असलेला कचरा बाहेर काढण्यासाठी साधारणपणे दीड हजार हायवा गाड्यांची आवश्यकता भासणे अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षात केवळ दीडशे गाड्यांमधूनच कचरा बाहेर नेण्यात आल्याचे समोर येत असल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणाची स्वतंत्र व सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

प्रतिदिन चार टन अतिरिक्त कचरा दाखवला? सध्या शहरातून दररोज अंदाजे आठ टन कचरा डेपोवर जमा होत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र मागील पाच वर्षांच्या कचऱ्याचा अंदाज मांडताना दररोज तब्बल १२ टन कचरा दाखवण्यात आला. म्हणजेच प्रतिदिन सुमारे चार टन अतिरिक्त कचरा दाखवून टेंडरची किंमत वाढवण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

COMMENTS