Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भोंदू अशोक खरातला मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई; कोट्यवधींची रोकड, दागिने आणि आलिशान मोटार जप्त

मुंबई : तथाकथित भोंदू अशोक खरात याला अंमलबजावणी संचालनालय अर्थात 'ईडी'ने (ED) यापूर्वीच अटक केली असून, मनी लाँड्रिंग आणि कथित खंडणी प्रकरणात ईडीन

भोंदू अशोक खरातचा ताबा ईडीकडे
‘न्यूजक्लिक’वरील ईडी (ED) कारवाई अखेर रद्द; निष्पक्ष पत्रकारितेवर सत्तेचा मनमानी वापर झाल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे निरीक्षण
राहात्यात समता पतसंस्थेवर ईडीची धाडदिवसभर चौकशी; अशोक खरात प्रकरणी कोट्यवधींच्या व्यवहारांचा तपास
ED Arrests Ashok Kharat | Nashik Ashok Kharat Case Updates | Money  Laundering | Extoertion

मुंबई : तथाकथित भोंदू अशोक खरात याला अंमलबजावणी संचालनालय अर्थात ‘ईडी’ने (ED) यापूर्वीच अटक केली असून, मनी लाँड्रिंग आणि कथित खंडणी प्रकरणात ईडीने सोमवारी कोट्यवधी रुपयांचे दागिने आणि आलिशान कार जप्त केली आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरात हा धार्मिक कार्याच्या आडून लोकांना भीती दाखवत मोठ्या प्रमाणावर पैसे उकळत होता. आध्यात्मिक उपाय आणि विविध संकटांपासून मुक्तीचे आमिष दाखवून त्याने अनेकांकडून कोट्यवधी रुपये उभा केल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. या आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेण्यासाठी मागील महिनाभरात विविध ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या.

या कारवाईदरम्यान तब्बल १३ कोटी ९२ लाख रुपयांची रोकड, परदेशी चलन तसेच मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. याशिवाय विविध बँक खात्यांतील सुमारे २ कोटी २५ लाख रुपयांची रक्कम गोठवण्यात आली आहे. गुन्ह्यातील पैशातून खरेदी केल्याचा संशय असलेली एक महागडी आलिशान मोटारही जप्त करण्यात आली आहे.

तपासादरम्यान काही डिजिटल साधने, आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे आणि कथित बेनामी मालमत्तांची माहितीही अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, धार्मिक उपक्रमांचा आधार घेत अशोक खरातने मोठे आर्थिक जाळे उभे केले होते. त्याने जमा केलेला पैसा नेमका कुठे गुंतवला गेला, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि या व्यवहारांत इतर प्रभावी व्यक्तींचा संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे. आगामी चौकशीत आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS