Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना सुरू होणार नाही : सहकारमंत्री

भुईंज / वार्ताहर : किसन वीर साखर कारखान्याने गेल्या हंगामात उचललेली थकहमीची रक्कम अद्याप पुर्ण भरली नाही. काही बाबी न्यायप्रविष्ठ असल्यामुळे शासन

ई-पीक पाहणी; सर्व्हर डाऊनमुळे शेतकरी हैराण!
पाऊस पडला तरच पेरणी करा
शेतकर्‍यांचे प्रश्‍न प्राधान्यांने सोडवा

भुईंज / वार्ताहर : किसन वीर साखर कारखान्याने गेल्या हंगामात उचललेली थकहमीची रक्कम अद्याप पुर्ण भरली नाही. काही बाबी न्यायप्रविष्ठ असल्यामुळे शासनाकडून आर्थिक मदत मिळू शकत नाही. परिणामी हा कारखाना सुरु होऊ शकत नाही, अशी माहिती सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
जांब (ता. वाई) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर आ. मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितिन पाटील, राष्ट्रवादी आयटी सेलचे अध्यक्ष सारंग पाटील, सभापती संगिता चव्हाण, उपसभापती भैय्या डोंगरे, मनिषा गाढवे, मनिषा शिंदे, शशिकांत पवार, सचिन पवार, सुधाकर गायकवाड, नितेश डेरे, तहसिलदार रणजित भोसले, प्रमोद शिंदे आदी उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले,“सहकार कायद्यातून पाहिल्यास चुकीचे काम करणार्‍या व स्वतःही पुढे जायचे नाही व दुसर्‍यालाही पुढे जाऊ द्यायचे नाही, अशी प्रवृत्ती या ठिकाणी दिसून येत आहे. चुका सापडूनही त्याला न्यायालयातून स्टे ऑर्डर मिळविल्याने कारखाना दुसर्‍यालाही चालवयला देता येत नाही. त्यामुळे किसन वीर कारखान्याचा हंगाम चालू शकत नाही. किसन वीर आबांनी या परीसरातील शेतकर्‍यांचे जीवन सुधारावे, त्यांच्या पिकाला स्थानिक बाजारपेठ निर्माण व्हावी, म्हणून हे सहकाराचे मंदीर उभे केले. त्यामुळे येथील शेतकर्‍यांचे परीवर्तन झाले. पण, आत्ता दुर्दैवाने हे मंदीर आज बंद आहे. गेल्यावर्षी 32 कारखान्यांना थकहमी देण्यात आली होती. त्यात किसन वीर कारखाना व खंडाळा कारखाना होता. या दोन्ही कारखान्यांना आर्थिक सहकार्य केले. दोन्ही कारखान्यांची रक्कम उचलली. दुर्दैवाने खंडाळा तर सुरु झाला नाही आणि किसन वीरचे गळीत झाले नाही. शासनाने थकहमीच्या माध्यमातून दिलेले पैसेही परत आले नाहीत. अडचण फार मोठी आहे. शाश्‍वत पिक असल्याने ऊसाचे क्षेत्र वाढले आहे.

COMMENTS