Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमृतवाहिनी तंत्रनिकेतनमध्ये डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ; पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

संगमनेर : अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक), संगमनेर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी डिप्लोमा प्रथम

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना ‘साने गुरुजी जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर
अमृतवाहिनी बँकेचा1200 कोटींचा व्यवसायमाजी मंत्री थोरात ; ‘ बिजनेस समिट २०२६’ उत्साहात
आंतरराष्ट्रीय लोककला स्पर्धेसाठी संगमनेरच्या त्रिशा कदमची निवड; ‘भारत महोत्सव २०२६’ मध्ये मिळवला प्रथम क्रमांक
Amrutvahini College of Engineering – Free-Apply.com

संगमनेर : अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक), संगमनेर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी डिप्लोमा प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष (Direct Second Year) प्रवेश प्रक्रियेअंतर्गत मार्गदर्शन व फॅसिलिटी सेंटरची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमास विद्यार्थी व पालकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती प्राचार्य प्रा. व्ही. बी. धुमाळ यांनी दिली.

ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि कार्यकारी विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी तंत्रनिकेतनने नेहमीच गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी असलेल्या उत्तम समन्वयामुळे मागील शैक्षणिक वर्षात तब्बल ६२७ विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजवर नोकऱ्या (Placements) मिळाल्या आहेत.

नवीन शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रियेची मुदत २२ जूनपर्यंत आहे. या फॅसिलिटी सेंटरमध्ये विद्यार्थ्यांना योग्य शाखा निवडणे, ऑनलाईन अर्ज भरणे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणे तसेच करिअर निवडीबाबत तज्ज्ञांमार्फत मोफत व सखोल मार्गदर्शन केले जात आहे.

सदर फॅसिलिटी सेंटर प्राचार्य प्रा. व्ही. बी. धुमाळ व उपप्राचार्य प्रा. जी. बी. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. यामध्ये प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रा. एस. एस. तळेकर, प्रा. आर. के. सातपुते तर थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी प्रा. व्ही. डी. कांडूरे व प्रा. ए. एस. दिघे आणि त्यांचे सहकारी विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत मदत करत आहेत.

COMMENTS