Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुहा येथे उद्या गावधोंडा सोहळ्याची सांगता; महाविष्णू यागाची होणार पूर्णाहूती

देवळाली प्रवरा : गुहा (ता. राहुरी) येथे पुरुषोत्तम अधिक मासानिमित्त गेल्या दोन महिन्यांपासून घराघरांत सुरू असलेल्या श्रीविष्णुसहस्रनामाच्या अखंड

NEET प्रश्नपत्रिका गैरव्यवहार प्रकरणात आणखी दोघांना अटक; एक डॉक्टर तर दुसरा प्राध्यापक, आतापर्यंत १३ आरोपी ताब्यात
एमआरपीच्या नावाखाली ग्राहकांची लूट थांबवा; ग्राहक पंचायतचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनजागृती आंदोलन
सुवर्णा शिंदे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी

देवळाली प्रवरा : गुहा (ता. राहुरी) येथे पुरुषोत्तम अधिक मासानिमित्त गेल्या दोन महिन्यांपासून घराघरांत सुरू असलेल्या श्रीविष्णुसहस्रनामाच्या अखंड नामसाधनेची सांगता सोमवारी (दि. २५) गुहा येथे गावधोंडा, अकरा कुंडी श्री महाविष्णू यागाची पूर्णाहूती, भजन-कीर्तन आणि महाप्रसादाने होणार आहे. विशेष म्हणजे संपूर्ण उपक्रम कोणत्याही देणगीशिवाय धर्मसेवार्थ राबविण्यात आला आहे.

श्री सोमनाथ कुलकर्णी गुरुजी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमात भाविकांनी आपल्या घरी दररोज श्रीविष्णुसहस्रनाम पठण व तुलसी अर्चन केले. त्याचबरोबर गुहा येथे अकरा कुंडी श्री महाविष्णू याग, होमहवन, लक्ष तुलसी अर्चना तसेच विविध धार्मिक विधी पार पडले. यानंतर आयोजित तीर्थयात्रेतही अनेक भाविक सहभागी झाले होते.

अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर गावधोंडा सोहळ्याला यंदा विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले असून गंगा दशहरा समाप्तीनिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमात दिवसभर पूजा-अर्चा, हरिनाम, भजन, कीर्तन सेवा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. “अधिकस्य अधिक फलम्” या संकल्पनेवर आधारित या उपक्रमामुळे ग्रामीण भागात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण कार्यक्रम श्री सोमनाथ कुलकर्णी गुरुजी यांच्या स्वखर्चातून निशुल्क आयोजित करण्यात आला आहे. या गावधोंडा व महाप्रसाद सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

COMMENTS