Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या नेत्याला रस्त्यावर केक कापणे पडले महागात; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

पुणे : सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस साजरा करत हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. येरवड्यात भररस्त्यात टेबल टाकून

पुणे विमानतळाला धमकीची चिठ्ठी; गुवाहाटीला जाणाऱ्या विमानात स्फोटक असल्याच्या उल्लेखाने खळबळ
जनगणनेच्या कामावरील शिक्षिकेचा अपघातात मृत्यू; पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील दुर्दैवी घटना
बळी विषारी दारूचे की व्यवस्थेचे?
पुण्यात माजी नगरसेवकाचा धिंगाणा, रस्त्यात कोल्ड फायर लावून केक कापला;  बर्थडे सेलिब्रेशन महागात | महाराष्ट्र बातम्या - News18 Marathi

पुणे : सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस साजरा करत हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. येरवड्यात भररस्त्यात टेबल टाकून केक कापून वाढदिवस साजरा करणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका माजी नगरसेवकाला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी माजी नगरसेवकासह त्यांच्या मुलावर आणि इतर सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

माजी नगरसेवक किशोर राजाराम विटकर (वय ५१) यांच्यासह इतर सहा ते सात जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, शांततेचा भंग करणे आणि हुल्लडबाजी करणे यांमुळे पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. वाढदिवसाच्या नावाखाली रस्त्यावर होणाऱ्या अशा हुल्लडबाजीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी हा कडक इशारा दिला आहे.

COMMENTS