Homeताज्या बातम्या

जनगणनेच्या कामावरील शिक्षिकेचा अपघातात मृत्यू; पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील दुर्दैवी घटना

पुणे : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात असलेल्या एका महिला शिक्षिकेचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात घ

पुणे विमानतळाला धमकीची चिठ्ठी; गुवाहाटीला जाणाऱ्या विमानात स्फोटक असल्याच्या उल्लेखाने खळबळ
बळी विषारी दारूचे की व्यवस्थेचे?
विवाहितेचा 8 व्या मजल्यावरून पडून मृत्यू
Mawal Teacher Death During Census Work; Govt Under Fire

पुणे : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात असलेल्या एका महिला शिक्षिकेचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात घडली. कान्हे फाटा परिसरात भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्याने शिक्षिका दिपाली तांबे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर शिक्षक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त करत शिक्षकांवर वाढत्या शासकीय कामांच्या ताणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिपाली तांबे या जनगणनेच्या कामासाठी जात असताना जुना पुणे-मुंबई महामार्गावरील कान्हे फाटा येथे हा अपघात झाला. त्यांच्या मोपेडला वेगाने येणाऱ्या डंपरने धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यात सध्या जनगणना तसेच विशेष पडताळणीसारखी विविध शासकीय कामे सुरू असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत आहे. सुट्टीच्या दिवशीही शिक्षकांना कामासाठी पाचारण केले जात असल्याने शिक्षक संघटनांमध्ये नाराजी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर घडलेल्या अपघातामुळे शिक्षकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

शिक्षक संघटनांनी प्रशासनावर टीका करत, शासकीय कामांच्या वाढत्या ताणामुळे शिक्षकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचा आरोप केला आहे. तसेच महामार्गावर धावणाऱ्या जड वाहनांवर नियंत्रण आणावे, सुरक्षित वाहतूक व्यवस्था करावी आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

COMMENTS