Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव शहरात नालेसफाई मोहिमेस प्रारंभ

कोपरगाव : नगरपालिकेच्या वतीने शहरात मान्सूनपूर्व नालेसफाई मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. नगराध्यक्ष पराग संधान यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या हिता

आई ही प्रत्येक मुलाच्या आयुष्यातील पहिला गुरु : ऍड. देशपांडे ; ‘स्वाभिमानी माऊली’ पुरस्कारांनी आठ आदर्श मातांचा गौरव
पाथर्डीत सेवानिवृत्त अधिकाऱ्याची तीन लाखांची फसवणूक 
नगर अर्बन बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी सुधाकरपंत गारडे यांचे निधन

कोपरगाव : नगरपालिकेच्या वतीने शहरात मान्सूनपूर्व नालेसफाई मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. नगराध्यक्ष पराग संधान यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने या स्वच्छता मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
पावसाळ्यात अनेक ठिकाणी नाल्यांवर पाणी साचण्याच्या समस्या निर्माण होत असल्याने संभाव्य अडचणी लक्षात घेऊन नगरपालिकेने संबंधित नाल्यांमधील घाण, कचरा आणि साचलेला गाळ काढण्याचा निर्णय घेतला आहे.
या मोहिमेअंतर्गत गोकुळनगरी पूल ते नदीपर्यंतच्या खंदक नाल्यासह आढाव वस्ती ते खडकी परिसरातील प्रमुख नाल्यांच्या साफसफाईच्या कामास प्रारंभ करण्यात आला. नाल्यांमध्ये साचलेला गाळ, कचरा व इतर घाण काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.
आमदार विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याला विशेष महत्त्व देण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेमार्फत विविध विकासकामे आणि नागरिकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत असून त्यातून शहरातील अनेक समस्या दूर होण्यास मदत होत आहे.
शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात यावी, कोणत्याही ठिकाणी गाळ किंवा कचरा शिल्लक राहू नये, अशा सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी सांगितले.
यावेळी उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, गटनेते प्रसाद आढाव, आरोग्य सभापती वैभव आढाव, संदीप देवकर, विजया देवकर, कैलास मंजूळ, संजय उदावंत, सिद्धार्थ सोनवणे, निसार शेख, सिद्धेश कपिले, वैभव गिरमे, दीपक जपे, राहुल खरात, चंद्रकांत टेके, कैलास सोमासे, कल्पेश नरोडे, रिंकेश नरोडे, प्रशांत वाबळे, शोहेब शेख, साजिद पठाण, स्वराज सूर्यवंशी, भैय्या नागरे, आयुब शेख, संदीप कोपरे, युनूस शेख तसेच नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS