श्रीगों : श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या पथकाने हरवलेले मोबाईल शोधून काढण्याच्या मोहिमेत उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्यातील नागरिकांचे सुमारे १ लाख

श्रीगों : श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या पथकाने हरवलेले मोबाईल शोधून काढण्याच्या मोहिमेत उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्यातील नागरिकांचे सुमारे १ लाख ५५ हजार रुपयांच्या किमतीचे मोबाईल शोधून मूळ मालकांच्या ताब्यात दिले आहेत. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून श्रीगोंदा पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.
श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीत विविध ठिकाणांहून नागरिकांचे मोबाईल हरवले होते. संबंधित नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी दिल्यानंतर पोलीस प्रशासनाने तांत्रिक तपासाच्या माध्यमातून मोबाईलचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर सात नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले.
ज्या नागरिकांचे मोबाईल परत मिळाले त्यामध्ये अश्विनी राजेंद्र खेडेकर (बेलवंडी स्टेशन, ता. श्रीगोंदा), दत्तात्रय ज्ञानदेव दरेंकर (हिरडगाव, ता. श्रीगोंदा), प्रतीक कैलास पारखे (सरोदी, ता. श्रीगोंदा), अनिल ज्ञानदेव प्रधान (वाघोली, पुणे), रोहन पोपट वडवकर (वेलू, ता. श्रीगोंदा), अरबाज अब्दुल रज्जाक मन्सूर (लोणी बुद्रुक) तसेच बबन नुकाराम सांगळे (पारगाव सुद्रिक, ता. श्रीगोंदा) यांचा समावेश आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुक्का सुर्दशन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या आदेशानुसार करण्यात आली. या मोहिमेत पोलीस कर्मचारी सचिन गोरे यांनी विशेष परिश्रम घेत मोबाईल शोधून काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने संबंधित नागरिकांनी श्रीगोंदा पोलिसांचे आभार मानले असून, पोलिसांच्या तत्परतेचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.

COMMENTS