संगमनेर : चाळीस वर्षे सातत्याने काम करून तालुका विकास कामांमधून उभा केला. पठार भागासाठी मुळा नदीवर बंधाऱ्यांचे जाळे निर्माण केले. गावोगावी विकासाच्या योजना राबवल्या. तालुक्याला वरदान ठरणारी नाशिक पुणे रेल्वे ही साकुर मार्गे सरळ जाणार होती. मात्र ज्यांना तालुक्याचा विकास पहावत नाही अशा लोकांनी राजकीय हेतू ठेवून तालुक्याची रेल्वे पळवली असल्याची टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली असून तालुक्यात वाढत झालेली हप्तेखोरी व टक्केवारी हा अत्यंत हा चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी म्हटले.साकुर येथील विरभद्र लॉन्स येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ऊस विकास मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते बाजीराव पाटील खेमनर, व्हा. चेअरमन पांडुरंग पा. घुले, सभापती शंकरराव खेमनर, व्हीएसआयचे शास्त्रज्ञ डॉ. सुशील कपिल, डॉ. समाधान सुरवसे , इंद्रजीत भाऊ थोरात, इंद्रजीत खेमनर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.या मेळाव्यात बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या सहकार्यातून मुळा नदीवर ठिकठिकाणी बंधारे बांधण्याचे काम आपण केले. प्रत्येक गावात विकासाच्या योजना राबवल्या. तालुक्याचा लौकिक राज्यभरात वाढवला. तालुक्यात विविध रस्त्यांची कामे मार्गी लावली. 2024 मध्ये अनेक रस्ते मंजूर केले. मात्र सत्तेवर आलेल्या लोकांनी रस्त्यांची कामे रद्द केली. तालुक्यासह या भागाला वरदान ठरणारी नाशिक पुणे रेल्वे साकुर हा मार्ग निवडला हा अत्यंत सोयीचा आणि सरळ मार्ग होता. रेल्वेसाठी जमीन अधिग्रहण करून सुमारे पाचशे कोटी शेतकऱ्यांना दिले गेले त्यावेळेस जीएमआरटीचे कोणतेही कारण नव्हते.मात्र ज्यांना तालुक्याचा विकास पाहावत नाही अशा मंडळींनी राजकीय हस्तक्षेपातून रेल्वे मार्ग बदलण्याचा प्रयत्न केला. आता तर या हायस्पीड रेल्वे ऐवजी गुजरातला मंजुरी दिली आहे. त्यामुळे अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. या विभागाच्या कृषी, शिक्षण, रोजगारसाठी संगमनेर सरळ रेल्वे मार्गे गरजेचे असून यासाठी आपला पाठपुरावा राहणार आहे. ज्यांनी रस्त्यांची कामे रद्द केली. ते आता कामाबाबत बोलत आहे. तालुक्यात वाढलेली हप्तेखोरी आणि टक्केवारी हा अत्यंत चिंतेचा विषय असल्याचे ते म्हणाले.

COMMENTS