Homeताज्या बातम्याअहमदनगर

अवकाळीने बाधित शेतकऱ्यांसाठी २५ कोटींची मदत मंजूर

अहिल्यानगर : मार्च २०२६ दरम्यान विविध जिल्ह्यांत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांसाठी राज्य शासनाने मदत जाहीर केली असून, अहिल्यानगर जिल्ह्यातील २७ हजार ६०२ बाधित शेतकऱ्यांसाठी २५ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर मिळालेल्या या मदतीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.राज्य शासनाने शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी एकूण १६४ कोटी ८३ लाख ४४ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. ही मदत थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. मार्च २०२६ मध्ये राहुरी, नेवासा, राहाता, अकोले, नगर व पाथर्डी तालुक्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला होता. त्याचवेळी पारनेर, राहुरी व नेवासा तालुक्यांत गारपीट झाली होती. त्यानंतर नगर, राहुरी, पारनेर, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यांत पुन्हा गारपीटीचा तडाखा बसला.या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते, अंगणे व शेतांमध्ये गारांचा सडा पडला होता. द्राक्ष, आंबा, डाळिंब, टरबूज या फळपिकांसह गहू, हरभरा व चारा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पिके आडवी झाली होती. काढणीला आलेले गव्हाचे पीक जमीनदोस्त झाले, तर कापून ठेवलेला गहू भिजल्याने नुकसान अधिक वाढले होते. चारापिक असलेली मका पिकेही आडवी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी शासनाने जाहीर केलेल्या मदतीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

एकल महिला धोरणासाठी मसुदा समिती
मोफत गणवेश योजनेत महत्त्वपूर्ण बदल; १०० टक्के पॉलिस्टर कापडावर बंदी
ई-चलन संदर्भातील मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेऊ : मंत्री सरनाईक

COMMENTS