Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

नीट, महागाई व कांदा दर प्रकरणी काँग्रेस आक्रमक

नीट पेपरफुटी मुळे विद्यार्थी वर्गात असुरक्षिततेचे वातावरण आहे. पेट्रोल डिजेल दरवाढीमुळे महागाई वाढत आहे दुसरीकडे खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे जेवण मह

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आ.आनंदराव  बोंढारकर यांनी घेतली सदिच्छा भेट
जूननंतरच चित्र स्पष्ट! चिखलीकर, आष्टीकर, सुमठाणकर, जवळगावकर ; विरोधकांचा अंतिम उमेदवार कोण?
गोदावरी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी ’डीपीआर’ तयार करण्याचे शासनाचे पर्यावरण विभागाला आदेश; खा. डॉ.  गोपछडे यांच्या दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांना यश



नीट पेपरफुटी मुळे विद्यार्थी वर्गात असुरक्षिततेचे वातावरण आहे. पेट्रोल डिजेल दरवाढीमुळे महागाई वाढत आहे दुसरीकडे खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे जेवण महाग होत आहे, त्यात कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. सर्वत्र असंतोषाचे व असुरक्षिततेचे वातावरण असुन तात्काळ यावर तोडगा काढावा अशी मागणी काँग्रेस उत्तर जिल्हाध्यक्ष  पावडे यांच्या नेतृत्वात नांदेड काँग्रेसने केली आहे. दरम्यान त्यांच्या नेतृत्वात सदर मागण्यांचे निवेदन काँग्रेसच्या वतीने मंगळवार (दि.19) रोजी देण्यात आले.
नीट परीक्षेतील सर्व गैरप्रकाराची निष्पक्ष चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. दोषी कोचिंग क्लासेस चालकांकडून संबंधित विद्यार्थ्यांचे संपूर्ण कोचिंग शुल्क वसूल करून विद्यार्थ्यांना परत द्यावेत. पेट्रोल डिजेल व खाद्यतेलाचे वाढलेले दरवाढ कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा. कांदा उत्पादक शेतकर्‍यांना हमीभाव व योग्य बाजारभाव मिळवून द्यावा. कांदा खरेदी केंद्र सुरु करुन अनुदान जाहीर करावे अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.  यावेळी जिल्हाध्यक्ष  पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार, सुरेशदादा गायकवाड, डॉ. श्रावण रँपनवाड, सुरेंद्र घोडजकर, अनिल मोरे, डॉ. रेखा चव्हाण, बालाजी गाडे पाटील, केदार साळुंखे, आनंद चव्हाण, महेश देशमुख तरोडेकर, बालाजी चव्हाण, अब्दुल गफार, सत्यपाल सावंत, मुन्ना अब्बास, रमेश गोडबोले, आनंद कल्याणकर, गोविंद बाबा गोंड,  कुमार कुर्तडीकर, अजिज कुरेशी, शेर अली, सुरेश हटकर, दिपकसिंग हुजुरीया, गगन यादव, संजय वाघमारे, बापूसाहेब पाटील, अतुल पेदेवाड, माधवराव पवळे, गणेश ढगे, ज्योती कदम, अब्दुल फईम, आंबादास रातोळे, आदीसह इतर पदाधिकारी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS