Homeताज्या बातम्याबीड

बीड बायपासवर शेतकर्‍यांचा भव्य रास्ता रोकोसर्व्हिस रोड व स्लिप रोड 600 मीटर वाढविण्याची मागणी

बीड शहरालगत असलेल्या बीड बायपासवरील इमामपूर रोड परिसरात सर्व्हिस रोड व स्लिप रोड 600 मीटरने वाढविण्याच्या मागणीसाठी शेतकर्‍यांनी सोमवार (दि. 18 म

शिक्षकांच्या वैद्यकीय बिलांवर 100 रुपये बाँडचा अडथळा’300 पेक्षा जास्त मेडिकल प्रस्ताव वित्त विभागाने फेटाळलेबाँड व नोटरीची अट दूर करून सर्व मेडिकल प्रस्ताव तातडीने निकाली काढावे : महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेची मागणी
आनंदगाव बाल लैंगिक अत्याचार प्रकरण: माजलगाव न्यायालयाकडून आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (एचएसआरपी)नंबरप्लेट 30 जुन पुर्वी बसविणे बंधनकारक



बीड शहरालगत असलेल्या बीड बायपासवरील इमामपूर रोड परिसरात सर्व्हिस रोड व स्लिप रोड 600 मीटरने वाढविण्याच्या मागणीसाठी शेतकर्‍यांनी सोमवार (दि. 18 मे 2026) रोजी सकाळी 10 वाजता भव्य रास्ता रोको आंदोलन केले. हे आंदोलन महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस तथा सिनेट सदस्य ड. सुभाष राऊत आणि रामभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
शेतकर्‍यांच्या म्हणण्यानुसार, सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 हा रस्ता सन 2019-20 मध्ये बीओटी तत्त्वावर पूर्ण करण्यात आला. मात्र, छत्रपती संभाजी राजे चौक ते इमामपूर रोड दरम्यान जुन्या सोलापूर-धुळे-मांजरसुंबा मार्गाची उंची अधिक असल्याने रस्त्यालगतच्या शेतजमिनींवर परिणाम झाला असून अनेक ठिकाणी शेती करणे कठीण झाले आहे. सध्या इमामपूर रोड तसेच छत्रपती संभाजी राजे चौक (बार्शी रोड) येथे स्लिप रोड व सर्व्हिस रोडचे काम सुरू आहे. दरम्यान, समनापूरकडे जाणारा 20 फूट रुंदीचा रस्ता या परिसरात असून इमामपूर रोड ते छत्रपती संभाजी राजे चौक दरम्यानच्या स्लिप रोडमध्ये आणखी 600 मीटर वाढ केल्यास कोल्हारवाडी, समनापूर, इमामपूर व शिंदे वस्ती परिसरातील शेतकर्‍यांना मोठा फायदा होणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. या मागणीसंदर्भात संबंधित प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप करत परिसरातील शेतकर्‍यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले. यावेळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या छत्रपती संभाजीनगर येथील प्रकल्प संचालकांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात ड. सुभाष राऊत, रामभाऊ शिंदे, वामन लिंबाजी शिंदे, दिगंबर तुळशीराम शिंदे, अंकुश तुळशीराम शिंदे, मच्छिंद्र बाबुराव वाणी, रवींद्र मच्छिंद्र माने, जयदीप पांडुरंग पवार, भगवान लिंबाजी शिंदे, प्रविण पालीमकर, सातीराम ठोले, त्र्यंबक कानतोडे, अशोक ठोले, राजाभाऊ ठोले यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी सहभागी झाले होते.

COMMENTS