जळगाव : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकानेच इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचे लै

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकानेच इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पालक आणि नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी आरोपी शिक्षक नंदलाल नारायण मराठे याच्याविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या कुटुंबासह धरणगाव तालुक्यातील एका गावात राहते आणि स्थानिक जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेत आहे. या नराधम शिक्षकाच्या कृत्यामुळे शैक्षणिक वर्तुळातूनही तीव्र निषेध व्यक्त होत असून, पोलिसांनी याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

COMMENTS