Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

किनवटमध्ये 19 मेपासून भरडधान्य खरेदी केंद्र सुरू; आमदार-प्रशासनाच्या पाठपुराव्याला यश

किनवट तालुक्यात आधारभूत हमीभाव योजनेअंतर्गत ज्वारी आणि मका या भरडधान्याची प्रत्यक्ष खरेदी केंद्रे 19 मेपासून सुरू करण्यासाठी प्रशासनाने हालचालींन

अचानक पावसाचा कांदा उत्पादकाला जबर फटका
महाराष्ट्रात उभारणार जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठपणन मंत्री जयकुमार रावल ; निर्यात व्यवस्थाही बळकट करणार
सालेवडगावमध्ये कृषीदूतांचे उत्साहात स्वागत



किनवट तालुक्यात आधारभूत हमीभाव योजनेअंतर्गत ज्वारी आणि मका या भरडधान्याची प्रत्यक्ष खरेदी केंद्रे 19 मेपासून सुरू करण्यासाठी प्रशासनाने हालचालींना वेग दिला आहे. ऑनलाईन नोंदणी केलेल्या सर्व शेतकर्‍यांचे धान्य खरेदी व्हावे, यासाठी आमदार/मंत्री हेमंत पाटील यांनी मंत्रालय पातळीपासून तहसील प्रशासनापर्यंत सातत्याने पाठपुरावा केला.
1 मे ते 30 जून या कालावधीत खरेदीची मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र मे महिन्याच्या मध्यापर्यंत प्रत्यक्ष खरेदी सुरू न झाल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. बोधडी खुर्द येथील उद्धवराव मुंडे तसेच वाळकी-बोधडी बु. येथील शिवाजीराव दराडे यांनी ही समस्या आमदार हेमंत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर पाटील यांनी संबंधित मंत्री आणि प्रशासनाशी तातडीने संपर्क साधत पाठपुरावा केला. त्यानंतर तहसीलदार डॉ. शारदा चोंडेकर यांनी इस्लापूर येथे गोडाऊन उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू केली असून आवश्यक तयारी सोमवारपर्यंत पूर्ण होणार आहे. त्याच दिवशी किंवा मंगळवारी प्रत्यक्ष खरेदी सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, नोंदणी प्रक्रियेच्या काळात शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीसाठी धावपळ केली होती. प्रशासन आणि शेतकरी यांच्यात समन्वय राखण्यासाठी स्थानिक स्तरावरही प्रयत्न झाले. उपप्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयात शेतकर्‍यांच्या उपस्थितीत पत्रकार अरुण तम्मडवार आणि बी. एल. कागणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रक्रियेत अ‍ॅड. सुनिल येरेकार, शिवसेनेचे करण एंड्रलवार, नगरसेवक प्रशांत कोरडे यांच्यासह अनेकांनी शेतकर्‍यांना सहकार्य केले. एकूणच, दीर्घ प्रतीक्षेनंतर भरडधान्य खरेदी केंद्र सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

COMMENTS