Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

नांदेड जिल्हा परिषद मुख्यालयात अस्वच्छतेचा विळखाड्रेनेज तुंबल्याने दुर्गंधी; कर्मचारी व नागरिक हैराण

नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय परिसरात अस्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण झाली असून, मुख्य इमारतीसह महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा ग्रा

उष्माघातापासून सावध राहा ; नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी -जिल्हाधिकारी
तर्कशक्ती, अध्यात्म आणि समाजप्रबोधनाचा अनोखा संगमह.भ.प. राजू महाराज लोखंडे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवपद्मश्री डॉ. तात्यासाहेब लहाने व अभिनेत्री मेघना झुझम यांच्या हस्ते सन्मान
पोलीस फलकाचीही सुटका नाही!; गोदावरीसमोर पोलिसांनीच ‘कायद्याची हवा’ काढलीवाहतूक कोंडीवर कारवाई की विभागांतर्गत ‘एअर स्ट्राईक’? नागरिकांत चर्चा रंगली



नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय परिसरात अस्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण झाली असून, मुख्य इमारतीसह महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय तसेच अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती यांच्या शासकीय निवासस्थान परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसून येत आहे. कचर्‍याचे ढीग, तुंबलेल्या नाल्या आणि साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी निर्माण झाली असून अधिकारी व कर्मचार्‍यांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करावे लागत आहे.
परिसरातील अस्वच्छतेबाबत माध्यमांतून वारंवार वृत्त प्रसिद्ध होऊनही प्रशासनाने अपेक्षित पावले उचलली नसल्याने कर्मचारी व नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः अध्यक्षांच्या निवासस्थानाजवळील सुमारे सहा ते सात दशकांपूर्वीची जुनी ड्रेनेज लाईन पूर्णपणे बंद पडल्याने गटारातील पाणी उलटून परिसरात साचत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या चार-पाच महिन्यांपासून ही समस्या कायम असल्याने डासांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बांधकाम विभागाला अनेक वेळा लेखी स्वरूपात कळवूनही दुरुस्तीचे काम न झाल्याचा आरोप संबंधितांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे डेंग्यूसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. याशिवाय जिल्हा परिषद परिसरात मोठ्या प्रमाणावर भंगार वाहने पडून असल्याने मुख्यालयाचा परिसर विद्रूप झाला आहे. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित विभागीय अधिकार्‍यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असून जिल्हाधिकार्‍यांनी स्वतः पाहणी करून तातडीने स्वच्छता, ड्रेनेज दुरुस्ती आणि निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी कर्मचारी व नागरिकांकडून होत आहे.
मुख्यालयातच अस्वच्छतेचा कहर
नांदेड जिल्हा परिषद मुख्यालय परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून ड्रेनेज तुंबणे, कचरा साचणे आणि दुर्गंधीची समस्या गंभीर बनली आहे. अध्यक्षांच्या निवासस्थानाजवळील जुनी ड्रेनेज लाईन बंद पडल्याने सांडपाणी परिसरात साचत असून डासांचे प्रमाण वाढले आहे. कर्मचारी व नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई झालेली नाही. मुख्यालय परिसरात भंगार वाहने पडून असल्याने अस्वच्छतेत आणखी भर पडली आहे. डेंग्यूसारख्या साथींचा धोका लक्षात घेता जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने हस्तक्षेप करून स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि ड्रेनेज दुरुस्तीची मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

COMMENTS