संगमनेर : अमृतवाहिनी बँकेच्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल पुणे येथे ऑल इंडिया सहकारी बँक संमेलनामध्ये उत्कृष्ट डिजिटल व्यवस्थापन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुणे येथे ट्रस्ट इन्फो मीडिया यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑल इंडिया सहकारी बँक संमेलन 2026 या कार्यक्रमात संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेस उत्कृष्ट डिजिटल व्यवस्थापन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी अध्यक्ष गौतम नवीन, फेडरेशनचे राज्य अध्यक्ष अजय ब्रम्हेच्या, प्रसार भारतीचे राज्य अधिकारी उदय जोशी यांच्यासह विविध मान्यवर होते. बँकेच्या वतीने चेअरमन सुधाकर जोशी, व्हा. चेअरमन ऍड.नानासाहेब शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराथी, अंकुर काळे, अमित नारायण यांच्यासह आयटी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.अमृतवाहिनी सहकारी बँकेने सभासद व नागरिकांना अत्यंत आधुनिक व चांगल्या सुविधा देताना बँकेमध्ये यूपीआय पेमेंट,एटीएम,आयएमपीएस,मोबाईल बँकिंग या सर्व गोष्टी ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. याचबरोबर अत्यंत सूक्ष्म पद्धतीने नियोजन करून कुठल्याही ग्राहकाची काहीही तक्रार येणार नाही याची काळजी बँकेने घेतली आहे. बँकेचे महिन्याला 50 कोटी पेक्षा जास्त डिजिटल व्यवहार होत आहेत.या पुरस्कारानंतर बोलताना चेअरमन सुधाकर जोशी म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांमध्ये बँकेने बाराशे कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला असून बँकेचा नफा 11 कोटी 17 लाख रुपयांवर पोहोचलेला आहे. हे सर्व करत असताना बँकेने उत्कृष्ट कर्ज व्यवहार स्थापन करत बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के राखला आहे. या पुरस्काराबद्दल बँकेचे मार्गदर्शक माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आ.डॉ.सुधीर तांबे, आ. सत्यजित तांबे, दुर्गा तांबे, ऍड.माधवराव कानवडे,डॉ.जयश्री थोरात, रणजीतसिंह देशमुख, इंद्रजीत थोरात,डॉ.मैथिली तांबे, राजेश मालपाणी यांच्यासह अमृतवाहिनीच्या सर्व संचालक मंडळ आणि विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS