Homeताज्या बातम्याअहमदनगर

ओंकार गायकवाड मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा : घोगरे 

राहाता :  येथील १३ वर्षीय ओंकार गायकवाड यांच्या मृत्यूने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला असून या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या संशयानुसार हा प्रकार केवळ अपघात नसून घात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रभावती घोगरे यांनी गायकवाड कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले. त्यांनी कुटुंबीयांचे दुःख समजून घेत त्यांना धीर दिला आणि न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. घोगरे यांनी यावेळी पोलीस प्रशासनाकडे ठोस मागण्या मांडत या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी तात्काळ करण्यात यावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, असे स्पष्टपणे सांगितले. तसेच परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर त्वरित बंदी घालून नशेखोर व गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण आणणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.यासोबतच राहाता तालुक्यात वाढत चाललेली गुंडगिरी, दहशतीचे वातावरण आणि असामाजिक घटकांचा वाढता प्रभाव याकडेही त्यांनी गांभीर्याने लक्ष वेधले. कायदा व सुव्यवस्थेचा धाक कमी होत असल्याची चिंता व्यक्त करत राज्यकर्ते व पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी मागणी त्यांनी केली.या भेटीदरम्यान धनंजय भाऊ गाडेकर, उत्तमराव मते, गणेश सोमवंशी यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने या घटनेची पारदर्शक चौकशी व्हावी आणि कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी केली.  

निळवंडे सोसायटीच्या अध्यक्षपदी पवार तर पठाण उपाध्यक्ष
विकासकामांमध्ये राजकारण नव्हे जनहिताला प्राधान्यआ. रोहित पवार ; बसस्थानक, जिल्हा उपरुग्णालय, व्यापारी संकुलासह विविध कामांचा आढावा
बेकायदेशीर रस्त्यामुळे शेतजमिनीचे नुकसानचौकशी व नुकसानभरपाईसाठी श्रीगोंदे तहसिलसमोर उपोषण

COMMENTS