Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुल गांधींना सूरत कोर्टाने दिलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी उंटावरून साखर वाटून केले सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाचे स्वागत

अंबाजोगाई प्रतिनिधी - काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. कारण, गांधी यांना सूरत कोर्टाने सुनावलेल्या 2 वर्षा

संपूर्ण भारत देशच माझे घर
राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, कोर्टाकडून याचिका फेटाळली
शरद पवारांच्या भेटीनंतर निवडणूक चाणक्य राहुल गांधीच्या भेटीला l पहा LokNews24

अंबाजोगाई प्रतिनिधी – काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. कारण, गांधी यांना सूरत कोर्टाने सुनावलेल्या 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे गांधी यांना खासदारकी पुन्हा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गांधी यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचे आदरपुर्वक स्वागत केले. तसेच अंबाजोगाई शहरातील प्रमुख रस्त्यांवरून उंटावरून मिरवणूक काढून नागरिकांना 5 क्विंटल साखर वाटून आपला आनंद साजरा केला.
बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी या बाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना घटनाक्रम सांगितला की, देशाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधींना सूरत कोर्टाने दिलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळणे ही काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी मोठी बातमी आहे. न्यायमूर्ती गवई यांनी राहुल गांधी यांना सूरत कोर्टाने दिलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राहुल गांधी यांच्याकडून अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. तर राहुल गांधी यांच्या विरोधात महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. सुप्रीम कोर्टानं राहुल गांधी यांना मोठा दिलासा दिला आहे. राहुल गांधी यांच्या वतीने कोर्टात अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. तर, पूर्णेश मोदी यांच्या वतीने महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. सुप्रीम कोर्टानं राहुल गांधी यांना अधिक शिक्षा सुनावण्याचे निकष काय आहेत. त्यांना कमी शिक्षा देखील दिली जाऊ शकते, असं म्हटलं. याशिवाय त्यांच्या मतदारसंघातील जनतेचा अधिकार देखील अबाधित राहिला असता, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं सूरत कोर्टाने राहुल गांधी यांना 23 मार्च रोजी शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांचं लोकसभा सदस्यत्व ही निलंबित करण्यात आलं होतं. राहुल गांधी यांनी त्यानंतर गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिथं देखील त्यांना दिलासा मिळाला नव्हता. त्यानंतर राहुल गांधी सुप्रीम कोर्टात गेले होते. त्यानंतर त्यांना दिलासा मिळाला होता. त्यामुळे या निकालानंतर आमचे नेते राहुल गांधी यांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे. ती म्हणजे ‘काँग्रेसने नफरत के खिलाफ सत्यमेव जयते, जय हिंद’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

COMMENTS