Homeताज्या बातम्याबीड

वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून विद्यार्थ्यांनी पुढे जावे-हेमंत धानोरकरआई सेंटर प्रो: 21 डे चॅलेंज – अस्खलितपणे इंग्रजी बोलण्याचे आव्हान ; यशवंतांचा पालक सभेत गुणगौरव

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अंबाजोगाई शहरात मागील 17 वर्षांपासून अग्रेसर असलेल्या आई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित आई सेंटर प्रो चे

बीड जिल्ह्यात अनेक वर्षांनंतर पुन्हा ’रॉकेल’ पर्व; 62 रुपये दराने मिळणार रॉकेलतहसीलदार विलास तरंगे यांच्या हस्ते टँकरचे उध्दघाटन
राडी येथे खेती बचाव अभियानाचा शुभारंभ; शेतकर्‍यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन
पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाददिनदयाळ बँकेचे सीईओ महेश शेळके सायकलवरून पोहोचले बँकेत



विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अंबाजोगाई शहरात मागील 17 वर्षांपासून अग्रेसर असलेल्या आई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित आई सेंटर प्रो चे संचालक सर डॉ.नागेश जोंधळे हे शहरी व ग्रामीण भागातील तरूणांना योग्य दिशा, अचूक असे मार्गदर्शन व मोठी स्वप्ने पाहण्यासाठी अविरतपणे कार्यरत असून  त्यांच्या या कार्याला विद्यार्थी तसेच पालकांचाही उत्स्फूर्त सहभाग असून एक सजग, सुदृढ व इंग्रजी भाषेविषयी प्रचंड आवड व प्रभुत्व असलेली पिढी घडवण्याचे कार्य करत असल्याचे गौरवोद्गार योगेश्वरी नूतन विद्यालय येथील कृतिशील शिक्षक हेमंत धानोरकर यांनी आई सेंटर प्रो कॅम्पस गजानन कॉम्प्लेक्स, अंबाजोगाई येथे आयोजित पालक सभा तथा यशवंतांचा गुणगौरव सोहळा या कार्यक्रमात केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आई सेंटर प्रो चे संचालक तथा विश्वविक्रमवीर सर डॉ.नागेश जोंधळे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून क्रियाशील शिक्षक हेमंत धानोरकर, विशेष अतिथी म्हणून अर्थतज्ज्ञ राजकुमार साळवी व पत्रकार प्रशांत लाटकर यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख मार्गदर्शक हेमंत धानोरकर, उपस्थित मान्यवर आणि पालकांच्या हस्ते सर डॉ.नागेश जोंधळे लिखित द बेसिक स्पोकन इंग्लिश कोर्स पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीच्या मुखपृष्ठाचे अनावरण करण्यात आले. यावेळी दैनंदिन जीवनातील एक लाख वाक्य लिहून विश्वविक्रम करणारे 5 वी तील समर्थ सुषमा श्रीराम साखरे व 11 वी तील श्रेया पूनम अनिल ढोले यांचे मुखपृष्ठावर फोटो छापून त्यांना यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या सुरूवातीला केंद्र संचालक सर डॉ.नागेश जोंधळे यांनी प्रॅक्टिस, प्रॅक्टिस अँड मोअर प्रॅक्टिस, मेक्स अ मॅन परफेक्ट या टॅगलाईनवर विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. अंबाजोगाई शहरामध्ये मागील सतरा वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या बेसिक्स पासून ते डव्हान्स्ड स्किल्स डेव्हलपिंग प्रोग्राम यावरच आम्ही सातत्याने काम करीत आलो आहोत. तसेच विद्यार्थ्यांमध्ये अमुलाग्र बदल घडवत आलो आहोत. हेच आपल्या यशाचे रहस्य आहे असे आपल्या प्रास्ताविका मध्ये सर डॉ.जोंधळे यांनी सांगत उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले. आपल्या पाल्याच्या अभ्यासामध्ये पालकांची काय जबाबदारी आहे याचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले. तसेच पाल्याच्या जडणघडणीत पालकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी 1 मे ते 31 मे 2026 पर्यंत खात्रीने व अस्खलितपणे इंग्रजी बोलण्यासाठी 31 दिवसांचे चॅलेंज देऊन मुलांना प्रोत्साहित केले व विविध पारितोषिकांची घोषणा केली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी हेमंत धानोरकर यांनी 21 व्या शतकामध्ये सर्वांना स्किल्सची आवश्यकता आहे. यासंबंधी मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना आवश्यक असणार्‍या स्किल्स पैकी संवाद कौशल्ये, चिकित्सक विचार, डिजिटल साक्षरता आणि सहकार्य या चार स्किल्स संबंधी विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना समजेल अशा सहज व सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितल्या. विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवावे आवश्यक तेवढा वेळ मुलांच्या हातात मोबाईल द्यावा ज्याचा उपयोग त्याच्या ज्ञानामध्ये होईल. पालकांनी मुलांच्या मोबाईल वापराविषयी सतर्क राहण्याचे  तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून विद्यार्थ्यांनी पुढे जावे असे आवाहन त्यांनी केले. सदरील कार्यक्रम प्रसंगी 23 मार्च ते 12 एप्रिल 2026 या 21 दिवस चॅलेंज स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यामध्ये चॅम्पियन गटातून सान्वी गुट्टे, प्रिषा एकलवले, तसेच लीडरशिप बॅचमधील पल्लवी माने, मंजिला एकलवले, अंकिता भुरे, शारदा वड्डे यांनाही  त्यांच्या परिवारासह सन्मानित करण्यात आले. तसेच 1 मे ते 31 मे 2026 या कालावधीत आयोजित नवीन चॅलेंजेस स्पर्धेमध्ये पहिल्या तीन दिवसांत छान कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये राजवीर प्रशांत लाटकर, आरोही व सिताराम अशोक सोलनकर, यश स्वाती नागेश जोंधळे व रिद्धी बालिका राहुल साळुंके यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले. अशा रीतीने उत्साहपूर्ण वातावरणात पालक सभा संपन्न झाली. यावेळी आई सेंटरचे युवा समन्वयक पल्लवी माने यांनी उपस्थित मान्यवर, पालक व विद्यार्थ्यांचे ऋण व्यक्त केले. या पालक सभेसाठी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS